Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महापालिकेसाठी कोणत्याही परिस्थितीत महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्वच नेत्यांचे एकमत झाले असून आता उमेदवार निवडीच्या चाचपणीसाठी उपसमिती नेमण्यात येणार आहे. सिंचन भवन येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक उपस्थित होते.
बैठकीत तिन्ही पक्षांची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या वतीने युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपच्या (BJP) वतीने आमदार अमल महाडिक, प्रा.जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदील फरास, महेश सांवत, संदीप कवाळे प्रमुख असणार आहेत.
या उपसमितीची बैठक पार पडणार आहे. ही उपसमिती प्रत्येक प्रभागातील महायुतीच्या इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करणार आहे. त्यानुसार किती जागांवर कोण लढणार याची प्राथमिक चर्चा केली जाणार आहे.
त्यानुसार उपसमिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक या वरिष्ठ नेत्यांच्या समितीकडे अहवाल सादर करणार आहे. यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम जागा वाटपावर निर्णय घेणार आहे. एकूणच महायुतीच्या जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून, या बैठकीत महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी एकसंघ राहण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.