Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत समाधानकारक जागा मिळत नसल्याने आम आदमी कडून इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या जागा वाटपात कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढवत असल्याची घोषणा पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे. यावेळी काँग्रेसच्या कारभारी पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका करत. ही महापालिका निवडणूक सर्वच जागांवर लढवत असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.
कोल्हापूर शहरातील सामाजिक काम करणाऱ्या संघटना आणि समविचाराचे पक्ष आमच्या सोबत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वीस प्रभागात जवळपास 81 जागांवर स्वतंत्र लढण्याची तयारी आम आदमीकडून करण्यात आली आहे. जर सामाजिक संघटना आणि समविचारी पक्ष एकत्र आल्यास तर त्यांच्या सोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती संदीप देसाई यांनी दिली.
काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या इलेक्शन कॅम्पेन टॅगलाईनवरही आम आदमी पक्षाने सडकून टीका केली. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, पण यापूर्वी सत्तेत तुम्हीच होता. सातत्याने काँग्रेस सत्तेवरच आहे, तुम्ही काही करू शकला नाही. तुम्ही टक्केवारी थांबू शकला नाही, लोकांचे प्रश्न सोडवू शकला नाही. तुम्ही जर ही टॅगलाईन देत असाल तर आता कोल्हापूर कसं, घरात बसा असे होईल. अशा शब्दात संदीप देसाई यांनी टीका केली.
कोल्हापूर महानगरपालिकेत इंडिया आघाडीतून आम आदमी बाहेर पडल्यानंतर स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. मात्र समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा विचार असल्याचे संदीप देसाई यांनी स्पष्ट केले. त्यासंदर्भात आज सायंकाळी वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय होणार आहे. तसेच झाल्यास कोल्हापुरात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.