Mahadik Pattern Tararani Aghadi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Election : ताराराणी आघाडीच्या स्वतंत्र अस्तित्वाबाबत धनंजय महाडिकांनी दिली मोठी बातमी; महापालिका निवडणुकीत भिडणार...

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी महायुतीसोबत पुन्हा उतरणार असून महाडिक गट 8 जागांवर लढणार आहे. महायुतीचे समीकरण आणि भाजप–ताराराणी सहकार्य पुन्हा ठळक झाले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेच्या राजकारणातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी भाजपमध्ये विलीन होणार अशी चर्चा होती. महाडिक गटाने भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीचे अस्तित्व दिसणार का? असा सवाल कार्यकर्त्यांकडून होत होता. मात्र आता या चर्चांना ब्रेक मिळाला आहे.

येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत ताराराणी आघाडी महायुतीमध्ये आपले अस्तित्व दाखवणार आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत यंदा ताराराणी आघाडी महानगरपालिकेच्या रणांगणात उतरणार आहे. या संदर्भातील माहिती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सरकारनामाशी बोलताना दिली आहे.

2014 मध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी मिळाल्यानंतर महापालिकेच्या राजकारणात महाडिक यांची ताराराणी आघाडी आणि भाजपचा समझोता झाला. 2016 च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि ताराराणी एकत्र लढली. या लढतीत भाजपने 14 जागा तर ताराराणी आघाडीने 19 जागांवर विजय मिळवला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. त्यानंतर भाजप आणि ताराराणी आघाडी हे एकच हे समीकरण निर्माण झाले.

पाच वर्ष निवडणूक न झाल्याने महापालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. येत्या आठवडाभरात कोल्हापूर महानगरपालिकेसह राज्यातील 28 महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये महाडिक यांची ताराराणी आघाडी होईल, असे संकेत भाजपच्याच काही नेत्यांनी दिले होते. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील याला वारंवार वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. असे देखील स्पष्ट केले होते. मात्र आता महायुती म्हणून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लढत असताना ताराराणी आघाडी देखील या निवडणुकीत उतरणार आहे.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सरकारनामाशी बोलताना माहिती दिली की, महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना ही एकत्र लढेल. तर महायुती सोबत ताराराणी आघाडी देखील असणार आहे. जागा वाटपा संदर्भात ताराराणी आघाडी आठ ते दहा जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती देखील खासदार महाडिक यांनी दिली.

इच्छुकांचा दबाव आणि रणनीती

भाजप आणि शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे एकाला उमेदवारी दिल्यानंतर दुसरा इच्छुक नाराज होण्याची शक्यता आहे. त्याच्या नाराजीचा फटका भाजप (BJP) , शिवसेनेला बसू नये यासाठी ताराराणी आघाडी रिंगणात असणार आहे. शिवाय इच्छुक नाराज काँग्रेसच्या गळाला लागू नयेत, यासाठी ही रणनीती असू शकते.

शिवाय महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) उमेदवारांना तिसरा पर्याय म्हणून या आघाडीची मोठी भूमिका असणार आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महाविकास अडचणीत आहे. किंवा नाराजांची इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी ताराराणी आघाडी ही रिंगणात असू शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT