Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : शिवसेना अन् राष्ट्रवादीला 'बूस्टर डोस'; नवीन नेतृत्व तयार करण्याचे मोठे आव्हान

Shivsena & NCP Political Strategy for New Leadership in Kolhapur : मंत्रिपदानंतर पक्षाचे जाळे विस्तारित आणि नव्या नेतृत्वांना पुढे आणण्याची संधी दोघांनाही चालून आली आहे. इतकेच नव्हे तर पक्षातीलच नवे नेतृत्व तयार करण्यासाठी नामी संधी मिळाली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जणांना कॅबिनेट मंत्री पदावर वर्णी लागल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीला बूस्टर डोस मिळाला आहे. इतकेच नव्हे तर पक्षातीलच नवे नेतृत्व तयार करण्यासाठी नामी संधी मिळाली आहे.

विशेषत: पक्ष फुटी नंतर आमदार प्रकाश अबिटकर आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर दुसऱ्या गटांकडून गद्दारीचा शिक्का लावण्यात आला होता. तर मुश्रीफ यांनी कागल पुरताच राष्ट्रवादी मर्यादित ठेवण्याचा आरोप राष्ट्रवादी दुसऱ्या गटाकडून करण्यात आला होता. मात्र मंत्रिपदानंतर पक्षाचे जाळे विस्तारित आणि नव्या नेतृत्वांना पुढे आणण्याची संधी दोघांनाही चालून आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे एकमेव नेतृत्व म्हणून मंत्री मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे पाहिले जाते. राष्ट्रवादीतून एकमेव आमदार निवडून आल्यानंतर त्यांच्यावर कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीची स्थिती पाहता राज्य स्तरावर दुसरा चेहरा नसल्याने राष्ट्रवादीच्या सीमा मर्यादित झाल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर राष्ट्रवादीला नवा चेहरा आणि नव्या नेतृत्वगुणांना पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा गड मजबूत करण्याची संधी मुश्रीफ यांच्यापुढे आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेकडून प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar) यांना संधी मिळाल्यानंतर एकेकाळी सहा आमदार असलेल्या जिल्ह्यात मागील निवडणुकीत एका आमदारावर समाधान मानावे लागले. त्यामुळे जिल्ह्याची पुनर्बांधणी करण्यासाठी अबिटकर यांच्या रूपाने मंडलिक गटाला ताकद मिळणार आहे.

मंडलिक गटाचे असणारे चार ते सहा विधानसभा मतदारसंघातील जाळे पुन्हा एकदा घट्ट होण्यासाठी मदत होणार आहे. राज्याची जबाबदारी मिळाल्यानंतर अबिटकर यांना यांना मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. साठी कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभारणीचं मोठे आव्हान अबिटकर यांच्यापुढे आहे.

राज्यातील नेतृत्व करत असताना कार्यकर्त्यांच्या आणि मधल्या फळीतील पदाधिकाऱ्यांच्या भाकरीची सोय नेत्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा समन्वय साधून शब्द दिलेल्या समित्यांवर महामंडळावर नियुक्त्या करावे लागणार आहेत. त्यामुळे मुश्रीफ आणि अबिटकर यांच्यासमोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे आव्हान असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT