Gokul Dudh Sangh, Satej Patil, Shaumika Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Milk News: 'गोकुळ'मध्ये पाटील-मुश्रीफांचा डाव; शौमिका महाडिकांचा विरोध, अध्यक्षांना फोडला घाम

Gokul Dairy Announces Plan to Increase Board Directors: गोकुळ दूध संघात सध्या २१ संचालक आहेत. त्याची संख्या २१ वरून २५ करायची आहे. हा पोटनियम दुरुस्तीचा मुद्दा आजच्या संचालकांच्या बैठकीत मांडण्यात आला. नेत्यांची याबाबत चर्चा झाली आहे.

Rahul Gadkar

Gokul Dairy : कोल्हापूर जिल्हा बँके पाठोपाठ कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ दूध संघात ही संचालक वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा विषय गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. मात्र त्याला गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी विरोध केला आहे.

संचालकवाढ करण्याबाबत संदर्भात जोपर्यंत वरिष्ठ नेत्यांची चर्चा होत नाही तोपर्यंत या संचालक वाढीला आपला विरोध असणार आहे, असे सांगत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डावाला आव्हान दिले आहे. शिवाय गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांना देखील ठणकावून सांगितले आहे. गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयात ही बैठक झाली.

गोकुळ दूध संघात सध्या २१ संचालक आहेत. त्याची संख्या २१ वरून २५ करायची आहे. हा पोटनियम दुरुस्तीचा मुद्दा आजच्या संचालकांच्या बैठकीत मांडण्यात आला. नेत्यांची याबाबत चर्चा झाली आहे, त्यामुळे तो मंजूर करावा, अशी मागणी झाली. यावेळी विरोधात असलेल्या शौमिका महाडिक यांनी याला विरोध केला.

त्यामुळे २१ पैकी २० संचालकांनी याला मान्यता दिली आहे. यानंतर हीच पोटनियम दुरुस्ती सर्वसाधारण सभेत करावी लागणार आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळाली आहे. मात्र पुढे त्याला शासनस्तरावर मान्यता घ्यावी लागणार आहे. पुढील वर्षी गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यासाठी ही दुरुस्ती महत्त्‍वाची ठरणार आहे. मात्र, आजच्या बैठकीत २१ ची संख्या २५ का करावी, याबाबतचे समाधानकारक उत्तर महाडिक यांना मिळाले नाही.

हा मुद्दा पुढील निवडणुकीत महत्त्‍वाचा ठरणार आहे. सर्व विषयांमध्ये हा मुद्दा घेणे मला योग्य वाटले नाही. याबाबत सविस्तर चर्चा झाली पाहिजे. गोकुळ संघाच्या आणि सभासदांच्या फायद्यासाठी हा निर्णय होत असल्याचे माझे समाधान झाल्यास माझाही होकार असेल. मात्र, आज समाधान न झाल्यामुळे मी विरोध केला आहे, अशी भूमिका शौमिका महाडिक, संचालक, गोकुळ संघ यांनी मांडली आहे.

गोकुळमध्ये प्रत्येक संचालकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. सहकारी संचालिका शौमिका महाडिक यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ते आम्ही सकारात्मक दृष्टीने घेतले आहेत. संचालक वाढीचा प्रस्ताव संस्थेच्या भविष्यातील गरजांनुसार ठेवण्यात आला आहे.गोकुळ ही सर्वांची संस्था आहे. निर्णय एकतर्फी होत नाहीत. सर्वांची मते ऐकूनच निर्णय घेतले जातात. चर्चा, समजूत आणि सहकार्य यावरच गोकुळचा पाया उभा आहे. शेवटी आपल्या सगळ्यांचे ध्येय गोकुळची प्रगती हेच आहे, अशी प्रतिक्रिया गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT