Hasan Mushrif : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : बाजार समितीच्या निवडणुका कशा होणार, हे एक कोडेच : मुश्रीफांचा सवाल!

Kolhapur News : "शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्यात आमचे दुमत नाही"

सरकारनामा ब्यूरो

गडहिंग्लज : भाजपच्या पूर्वीच्या सरकारने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिला होता. आम्ही तो रद्द केला होता. आता पुन्हा एकदा सातबारा असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना संधी दिली आहे. शेतकऱ्यांना मताचा अधिकार देण्यात आमचे दुमत नाही; पण हे प्रत्यक्ष शक्य होणार नाही. यामुळे बाजार समितीच्या निवडणुका कशा पार पडणार होणार याचे कोडेच आहे, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचा प्रारंभ आणि गोडावूनचे उद्‍घाटन असा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते. संकेश्‍वर मार्गावरील पेट्रोल पंपाच्या आवारात हा कार्यक्रम झाला.

मुश्रीफ म्हणाले, "उत्पन्न वाढीसाठी प्रशासकीय मंडळाने पेट्रोल पंप सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला, याचे कौतुक आहे. मात्र, बाजार समितीच्या अनेक जागा पडून आहेत. त्याबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल. त्याशिवाय बाजार समिती स्वयंपूर्ण होणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, त्यांची फसवणूक टाळण्यासाठी बाजार समिती शेतमाल तारण योजना राबवत असेल, तर जिल्हा बँक सर्वात कमी व्याजदराने कर्जपुरवठा करेल."

यावेळी आमदार राजेश पाटील म्हणाले, ‘‘उलाढाल कमी झाल्याने बाजार समिती आर्थिक अडचणीत आहे. गतवेळी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये यशही आले. यावेळीही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी देऊया. राजकारण बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करूया.’’

यावेळी संतोष पाटील, सतीश पाटील, विक्रम चव्हाण-पाटील, रामाप्पा करिगार, गंगाधर व्हसकोटी, संभाजी पाटील, संभाजी भोकरे, संपत देसाई, चंद्रशेखर पाटील, सोमगोंडा आरबोळे, जितेंद्र शिंदे, गोविंद सावंत, जयकुमार मुन्नोळी आदी उपस्थित होते. मुकुंद देसाई यांनी स्वागत केले. अभय देसाई यांनी प्रास्ताविक केले. संजय थोरात यांनी सूत्रसंचालन केले. राजशेखर यरटे यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT