🔹 3-Point Summary:
उत्तम वरुटेंवर अविश्वास ठराव मंजूर: करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील सरपंच उत्तम वरुटे यांच्यावर ग्रामस्थांनी ३२८ मताधिक्याने अविश्वास ठराव मंजूर केला.
ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात मतदान: ग्रामसभेत १८३४ मतदार उपस्थित होते; १०४१ मते ठरावाच्या बाजूने, ७१३ विरोधात व ५५ मते बाद झाली.
संपूर्ण प्रक्रिया कडक सुरक्षा व्यवस्थेत पार पडली: पोलिस बंदोबस्त, तालुका पंचायत अधिकारी व सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान शांततेत पार पडले.
Kolhapur News: करवीर तालुक्यातील कसबा बीड येथील लोकनियुक्त सरपंच उत्तम वरुटे यांच्यावर सदस्यांनी अविश्वास ठराव आणत होता. यावर ग्रामस्थांची सहमती आहे की नाही यासाठी पार पडलेल्या मतदानात अखेर वरुटे यांनाच अपात्र व्हावे लागले. ग्रामस्थांनीच उत्तम वरुटे यांच्या विरोधात मतदान केल्याने लोकनियुक्त सरपंच अपात्र झालेत.
वरुटे यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव ३२८ मताधिक्क्याने मंजूर झाला. आज झालेल्या ग्रामसभेत चुरशीने मतदान होऊन ठरावाच्या बाजूने १०४१, तर ठरावाच्या विरोधात ७१३ मते पडली. ५५ मते बाद झाली. गुरुवारी ८ ते ११ या वेळेत ग्रामसभेला सुरुवात झाली. यावेळी १८३४ मतदार उपस्थित होते. एवढ्याच मतदारांना ११ ते ४ या वेळेत मतदानाचा अधिकार मिळाला. मतमोजणी मतदान केंद्रावरच झाली.
गेल्या अडीच वर्षांपासून सरपंच व सदस्यांमध्ये कामामध्ये समन्वय नव्हता. त्यामुळे सर्व अकरा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे फौजफाट्यासह दिवसभर तळ ठोकून होते. तालुका पंचायत अधिकारी डॉ. संदेश भोईटे व कर्मचारी उपस्थित होते.
सरपंच उत्तम वरुटे यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी विरोधातील तसेच त्यांच्या गटातील प्रमुख नेते मंडळी त्यांच्या विरोधात गेली होती, तरीही सरपंच उत्तम वरुटे यांनी अटीतटींची झुंज दिली. त्यांना पडलेली लक्षणीय मते गावातील नेते मंडळींना विचार करायला लावणारी आहेत. 'सोन्याचे गाव' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कसबा बीड गावात ही ऐतिहासिक राजकीय घडामोड घडली.
❓ 4 FAQs (with 1-line answers):
उत्तम वरुटे यांच्यावर अविश्वास ठराव का आणण्यात आला?
→ सदस्य व सरपंच यांच्यात दीर्घकाळ समन्वयाचा अभाव होता.
किती मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला?
→ ३२८ मताधिक्याने ठराव मंजूर झाला.
मतदान प्रक्रियेत किती मतदार सहभागी झाले?
→ १८३४ मतदारांनी ग्रामसभेला उपस्थिती लावली.
ही घटना कोणत्या गावात घडली?
→ ही ऐतिहासिक घटना कसबा बीड (ता. करवीर) येथे घडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.