Kolhapur Politics Sharad Pawar NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP SP Vs Mahayuti : शरद पवार गटाने चक्क पेपर छापून केले महायुतीच्या विरोधात आंदोलन

Rahul Gadkar

Kolhapur News, 27 August : कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Paawar) गटाने अनोखे आंदोलन करत लक्षवेधी पेपर वाटले. या पेपरमध्ये महायुतीचे काळे कारणामे प्रसिद्ध करत महायुती सरकार विरोधात आंदोलन केलं.

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे पेपर वाटून सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पवार गटाने महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणाचा बुरखा फाडत अनेक मुद्द्यांवर लक्ष वेधलं.

गेल्या दहा वर्षात केंद्र आणि भाजप (BJP) सरकारने महाराष्ट्राची अहवेलना करून महाराष्ट्राला झुकवण्याचं काम केलं आहे. अनेक उद्योग गुजरातला पळवून महाराष्ट्रात बेरोजगारीचे संकट वाढवलं आहे. दिवसेंदिवस महाराष्ट्र मूलभूत सुविधेपासून वंचित होत चालला आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील या परिस्थितीवर सर्वसामान्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोल्हापुरात राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटांकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. 'महायुतीचे काळे कारनामे' हा पेपर प्रसिद्ध करत नागरिकांना वाटण्यात आला.

महायुतीचे काळे कारनामे या पेपरमध्ये राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांचा बुरखा फाडला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ 60 हजार कोटी दिल्याने महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय होणार आहे. यासंदर्भात आवाज उठवण्यात आला आहे. त्याचबरोबर वाढता खर्च आणि कमी वेतन प्रणाली, प्रकल्प स्थलांतर, आर्थिक विकासाची घसरण, बेरोजगारीचे संकट, साखर उद्योगावरील संकट, भ्रष्टाचाऱ्यांना आसला.

तसंच कर्जमाफीचा फज्जा, दुग्ध व्यवसायाचे संकट, जातीय आरक्षण, सरकारी नोकरी, वाढती गुन्हेगारी आणि महिला अत्याचारात होणारी वाढ, हिट अँड रन प्रकरणात होणारी वाढ, ऐतिहासिक वारसांची दुरावस्था, महापुरुषांचा अवमान या सर्व गोष्टींकडे लक्ष या पेपरच्या माध्यमातून वेधण्यात आलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT