Satyajeet Kadam and Jayashree Jadhav News, kolhapur pot nivadnuk, Kolhapur by election 2022 result
Satyajeet Kadam and Jayashree Jadhav News, kolhapur pot nivadnuk, Kolhapur by election 2022 result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तरचा कौल कुणाला? फक्त तीनच तासांत होणार फैसला

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) आमनेसामने आले आहेत. काँग्रेसकडून जयश्री जाधव (Jayashree Jadhav) तर भाजपकडून सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांच्यात मुख्य लढत आहे. या पोटनिवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. कोल्हापूर उत्तरचा कौल यापैकी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मतमोजणी शनिवारी (ता.16) होणार असून, फक्त तीनच तासांत निकाल लागणार आहे. (Kolhapur by election 2022 result news)

कोल्हापूर उत्तरच्या मैदानात एकूण 15 उमेदवार होते. पोटनिवडणुकीचे मतदान 12 एप्रिलला झाले असून, निकाल 16 एप्रिलला लागणार आहे. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात मतमोजणी सुरु होईल. टपाली मतदानासाठी एक आणि ईव्हीएम मशिनच्या मतदानासाठी 14 असे एकूण 15 टेबलवर आणि 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी राखीवसह सव्वाशे अधिकारी आणि कर्मचारी असणार आहेत. त्यामुळे फक्त तीनच तासांत मतमोजणीचा निकाल जाहीर होईल, असा अंदाज आहे.

कोल्हापूर उत्तरची लढत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त झाली आहे. येथून त्यांच्या पत्नी जयश्री जाधव मैदानात उतरल्या आहेत. जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले आहे.

कोल्हापूर उत्तरच्या मैदानातील उमेदवार

जयश्री जाधव (काँग्रेस), सत्यजित कदम (भाजप), यशवंत कृष्णा शेळके (नॅशनल सोशालिस्ट पार्टी), विजय श्यामराव केसरकर (लोकराज्य जनता पार्टी), शाहिद शहाजान शेख (वंचित बहुजन आघाडी) आणि अपक्षांमध्ये सुभाष वैजू देसाई, बाजीराव सदाशिव नाईक, भारत ऊर्फ संभाजी भोसले, मनिषा मनोहर कारंडे, अरविंद भिवा माने, मुस्ताक अजीज मुल्ला, करुणा धनंजय मुंडे, राजेश ऊर्फ बळवंत सत्याप्पा नाईक, राजेश सदाशिव कांबळे, संजय भिकाजी मागाडे या उमेदवारांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT