Kolhapur News: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत खलबत्ते सुरू आहेत. एकीकडे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपल्या उमेदवारीवर दावा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ जाणार असल्याने क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती. मात्र मध्यरात्री पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारीवरून मोठ्या घडामोडी घडत असताना दिसत आहेत.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे आपल्या पुत्राच्या उमेदवारीसाठी आग्रही झाले आहेत. अशातच त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुत्रासह भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली केली, अशी खात्रीलायक माहिती आहे. कृष्णराज महाडिक यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून आग्रही आहेत. तर भाजपचे नेते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे भाजपकडून आग्रही होते. मात्र तीन दिवसांपूर्वी धनंजय महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्याने पुत्र कृष्णराज महाडिक यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं सांगितले जात होते.
तत्काळ राजेश क्षीरसागर यांना मुंबईला बोलवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर महाडिक आणि कृष्णराज महाडिक पुन्हा एकदा मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा आहे. त्यांच्या भेटीमुळे कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीची चर्चा आता सुरू झाली आहे. कृष्णराज महाडिक यांना शिवसेनेत प्रवेश करून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना विधान परिषदेत शब्द देण्याच्या देखील हालचाली सुरू आहेत. अशातच कृष्णराज महाडिक यांचा शिवसेनेत प्रवेश करून त्यांना उत्तरच्या मैदानातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या हालचाली आता जोराने सुरू झाले आहेत. दिवसभरात राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अधिकृत त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला नव्हता. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धनंजय महाडिक आणि कृष्णराज यांची मध्यरात्री भेट झाली असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.