Kolhapur Politcs : उचगाव ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निकालावरून आता राजकीय नाट्य रंगताना दिसत आहे. सरपंचपदाच्या निकालावर खासदार धनंजय महाडिक(dhananjay mahadik) आणि काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष व आमदार सतेज पाटील(Satej Patil) यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सरपंचपद निवडणूक पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी महाडीक गटाकडून करण्यात आली. यामुळे दोन्ही गटांमध्ये चांगलाच गदारोळ माजला.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात असे राजकीय नाट्य नवे नाही. याआधी पाचगावचा सत्तेसाठी संघर्ष दिसून दिसून आला होता. मात्र निवडणूक शांत वातावरणात पार पडली. मात्र यावेळी आता उचगाव ग्रामपंचायतीवरून वाद निर्माण झाला आहे. उचगावमध्ये ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी काँग्रेसकडून मधुकर चव्हाण आणि भाजपकडून सतीश मर्दाने यांच्यात थेट लढत झाली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अधिकृत निकाल घोषित करण्याआधीच मर्दाने यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला.
प्रत्यक्ष निकाल हाती आला, म्हणजे मतमोजणी पार पडल्यानंतर काँग्रेसच्या चव्हाण यांना ६९ मताधिक्याने विजयी जाहीर करण्यात आले. या निकालावर मर्दानेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. ही निवडणूक पुन्हा घ्यावी, अशी मागणी करत मोर्चा काढला. जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग, ग्रामपंचायत आणि गांधीनगर पोलिस ठाण्यात या ठिकाणीही या मागणीचे निवेदन मर्दानेंकडून देण्यात आले. याच मुद्द्यावरूनच आता खासदार महाडीक व आमदार पाटील यांच्यात राजकीय नाट्य रंगले आहे.
आमच्याकडून मोर्चा नाही - सतेज पाटील
राजकारण म्हणजे विजय -पराभव होतच असतो. आम्ही लोकशाही प्रक्रिया मानणारे आहोत. इतर ग्रामपंचायतीत, म्हणजे गांधीनगर, कंदलगाव अशा गावात आमचा ग्रामपंचायतीत सरपंच झाला नाही, म्हणून आम्ही काही मोर्चा काढला नाही.असा खोचका टोला ही सतेज पाटील यांनी लगावला.
लोकशाहीमध्ये जर पुन्हा मुदतसंपण्यापूर्वी निवडणुका घेण्याची पद्धत असती तर, आम्ही २०१४ लाच पुन्हा निवडणुका घ्या असे म्हंटलो असतो. ईव्हीएम मशीनमध्ये मतदानाची नोंद होते.आपापाले पोलिंग एजंट उपस्थित असतात. शंका घेण्यापेक्षा जो निकाल दिला तो मान्य करायला हवा. लोकशाहीत कोणी जिंकतो तर कोणी हरतोच.लोकशाही म्हणजे हे चालणारच. पराभव पचवावं एवढी ताकद असली पाहिजे, असे पाटील म्हणाले.
अज्ञातवासात गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये : धनंजय महाडिक
२०१४ च्या पराभवानंतर सहा महिने जे अज्ञातवासात गेले होते, त्यांनी आम्हाला पराभवाबद्दल उपदेश करू नये, असं प्रत्युत्तर खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. आतापर्यंत अनेक पराभव स्विकारूनच आम्ही यशाच्या शिखरावर पोहचलो. मतदानानंतर सतेज पाटील यांनी गावात अधिकाऱ्यांवर दबाव आणला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणं आहे, की मतदानाची फेरमोजणी व्हावी. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. याचा पाठपुरावा केला जाईल, असे खासदार महाडीक यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.