Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : "केंद्राचे आभार, मात्र हा अर्धवट निर्णय "...

Rahul Gadkar

Kolhapur News : केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी मागे घेतली आहे. बंदी उठवल्यामुळे साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राच्या निर्णयाबाबत शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी इथेनॉल बाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले मात्र हा निर्णय अर्धवट असल्याचा देखील त्यांनी सांगितले.

हसन मुश्रीफ म्हणाले, "7 लाख टनापर्यंत इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र आम्हाला केंद्र सरकार शंभर टक्के इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देईल अशी आशा होती. देशात किती साखर लागणार आहे? किती साखर निर्मिती होणार आहे? याचा आढावा घेऊन केंद्र सरकारने शंभर टक्के निर्मितीला परवानगी देणे आवश्यक होते. तसेच उद्योगासाठी 70 टक्के साखर लागते ती आयात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी"? असा सल्लाही मंत्री मुश्रीफ यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भविष्यात साखर तज्ञांशी चर्चा करून केंद्र सरकारकडे नव्याने काही मागण्या करणार आहे. त्यामुळे आपल्या देशात घरगुती वापरासाठी साखर पुरेल आणि त्याची किंमत देखील वाढणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

पुढे त्यांनी मराठा आरक्षणा बाबत बोलताना सांगितले, "मराठा समाजाला टिकणारा आरक्षण मिळावं आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वेळा याबाबत चर्चा झाली आहे. मंत्र छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातील वाद दोघांनी ही टाळले पाहिजे. माझी दोघांनाही विनंती आहे. अशा पद्धतीच्या बोलण्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल", असे मुश्रीफ यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत आम्ही दिलेल्या वाचनाचे आम्हाला पूर्णपणे स्मरण असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

(Edited By -Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT