Kolhapur Politics K Y Patil K P Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: अजितदादांच्या मेळाव्याला राधानगरीच्या दोन्ही पाटलांनी मारली दांडी; काय आहे कारण?

Kolhapur Politics K P Patil K Y Patil Ajit Pawar meeting: ए.वाय -के पी या दोघांची मेळाव्यातील अनुपस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. यातून या दोघांनी भविष्यात आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत नसल्याचे संकेत दिले आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: बिद्री सहकारी साखर कारखान्यावर कारवाई होण्याच्या भीतीने राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के पी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली, असा आरोप स्थानिक नेत्याने माजी आमदार पाटील यांच्यावर केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीला कमी मताधिक्य मिळाले. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांनी जिल्ह्यातील दोन नंबरचे मताधिक्य मिळाले. त्याच्या संशयाची सुई के.पी.पाटील यांच्याकडे फिरली आहे.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर के.पी. पाटील राजकीय सोयीस्कर भूमिका घेत यांनी महायुती सोडण्याचे संकेत दिले आहेत. नुकताच मुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्ह्यात दौरा झाला. यावेळी जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे तीन मेळावे घेण्यात आले. या तिन्ही मेळाव्यात के पी पाटील यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत तत्काळ गेलेल्या जिल्ह्यातील तत्कालीन जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी देखील पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. आगामी विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी, यासाठीच लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीच्या विरोधात भूमिका घेऊन आपली राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

शिवाय महायुतीत माजी आमदार के. पी. पाटील आल्याने आपल्या उमेदवारीबाबत अडचण निर्माण होऊ नये, यासाठीच लोकसभेला ए. वाय. पाटील यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ए. वाय. पाटील यांचं आधीच ठरलं असताना अजित पवार यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवून आपली राजकीय दिशाही स्पष्ट केली आहे. त्यामुळे ए.वाय -के पी या दोघांची मेळाव्यातील अनुपस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. यातून या दोघांनी भविष्यात आपण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत नसल्याचे संकेत दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत ए.वाय.पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना पाठिंबा दिला होता. तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी भूमिका गुपित ठेवून सुरवातीला महायुती सोबत राहिले. पण छुपे डावपेच आखून त्यांनी महाविकास आघाडीला मदत केल्याचे सांगितले जाते.

के पी ए. वाय हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. महायुतीमध्ये उमेदवारी मिळणे अवघड आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या मुळे या दोघांना महायुतीतून उमेदवारी मिळणे अवघड आहे. मात्र, ‘राष्ट्रवादी’ (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीमध्ये गेल्यास तेथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा, त्यांनीही लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT