Kolhapur Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: विधानपरिषदेच्या इच्छुकाला पत्नीच्या नगराध्यक्षपदाचे गाजर? वरिष्ठांच्या दबावाला झुकणार की झुकवणार

Kolhapur Politics Vidhan Parishad: कोल्हापूर जिल्ह्यातील एका नगरपालिकेत संदर्भात तालुकास्तरावर बैठक घेण्यात आली. बैठकीत थेट विधान परिषद निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारीसाठी हतबल झाल्याचं एका वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं.

Rahul Gadkar

kolhapur News: लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले. अशातच अकरावा आमदार कोल्हापूर जिल्ह्यातून असावा, यासाठी जिल्ह्यातील महायुतीतील नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे.

आगामी विधानपरिषद निवडणुकीतील धुमाळी येत्या वर्षभरात किंवा दीड वर्षात कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अनेक इच्छुकांनी रणशिंग फुंकली आहेत. काही इच्छुकांचा अश्वमेध विधान परिषदेच्या रणांगणात सलामी देत आहे. मात्र महायुतीतील नेत्यांनाच आता वरिष्ठांच्या दबावाला सामोरे जावे लागते की काय? अशी चर्चा आता कोल्हापूर आणि शेजारच्या दोन जिल्ह्यात सुरू झाली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या विधान परिषदेचे वातावरण थंड झालं असलं तरी पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेकांनी मतदान नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. या विधानपरिषद निवडणुकीत सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत उमेदवारी कोणाला मिळणार यावरून महायुती मधील दोन घटक पक्षातील नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. आता त्याचा परिणाम थेट नेत्यांवर होऊ लागला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील एका नगरपालिकेत संदर्भात तालुकास्तरावर बैठक घेण्यात आली. बैठकीत थेट विधान परिषद निवडणुकीला इच्छुक असणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारीसाठी हतबल झाल्याचं एका वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपल्या सौभाग्यवतींना संधी देऊया, अशा सूचना दिल्याचे सांगितले जाते.

महायुतीतील घटक पक्षाने या उमेदवारीवर दावा केल्याने, आपल्याला संधी मिळणे कठीण असल्याचं इच्छुकांना सांगितलं असल्याचं सांगितले जाते. त्यामुळे आता इच्छुक ही आपल्या सौभाग्यवतींचा अर्ज करण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र आगामी काळात याच वरिष्ठांच्या दबावाला विधान परिषदेतील इच्छुक झुकणार की झुकवणार हे पाहवे लागणार आहे.

बिनविरोधाचा प्लॅन फसला

नगरपालिकेसाठी दोन्ही गटाकडून बिनविरोध निवडणूक करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. सत्ताधारी गटाकडून समोरच्या गटासाठी आठ जागा आणि उपनगराध्यक्ष पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र समोरील गटाच्या एका विधानसभेतील उमेदवाराकडून या बिनविरोध प्रस्तावासाठी नकार कळविण्यात आला. दरम्यान सर्वच जागांवर आपण उमेदवार उभा करणार असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे महायुतीतील एक घटक पक्ष देखील या निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्रपणे उतरणार असल्याने या नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT