Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: काँग्रेसची बाजी, ठाकरेंच्या शिवसेनेची पीछेहाट, राष्ट्रवादीला बळ; कुणाला किती जागा मिळाल्या?

Congress Gains, Shivsena UBT Retreats, NCP SP Strengthens: महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जागा वाटपावरून अनेक मतदारसंघात तिढा होता. मात्र या स्पर्धेत काँग्रेसने बाजी मारत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. मागील विधानसभा निवडणुकीचे चार जागांवर विजय मिळवल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला.

काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी लावलेला जोर काँग्रेसच्या पथ्यावर पडला. जिल्ह्यातील दहा पैकी तब्बल पाच जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीला एक जागा वाढवून दिल्याने बळ मिळाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा जिल्ह्यातील तीन जागा लढवणार आहे. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहा जागा निवडून आलेल्या शिवसेनेला केवळ दोन जागांवरच समाधान मानावे लागले आहे.

राज्यात झालेल्या सत्ता बदलाचा परिणाम थेट जागा वाटपात झाला आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जागा वाटपावरून अनेक मतदारसंघात तिढा होता. मात्र या स्पर्धेत काँग्रेसने बाजी मारत आहे.

विद्यमान चार जागा आपल्याकडे ठेवत एका जागेची लॉटरी मिळवली. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला शिरोळ विधानसभा मतदारसंघही मिळवला.

काँग्रेसने जागा वाटपात मोठा वाटा घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने देखील बाजी मारली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा हात गायब झाला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. त्याबरोबर कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघही राष्ट्रवादीने मिळवला आहे.

2014 च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला होता. मात्र दहा वर्षानंतर म्हणजे 2024 च्या निवडणुकीत राज्यात बदललेल्या सत्ता समीकरणामुळे जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. राधानगरी मतदारसंघात आयता उमेदवार घ्यावा लागला. तर शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित पाटील सरूडकर मैदानात उतरवले.

महाविकास आघाडीचे उमेदवार

  • कोल्हापूर दक्षिण -ऋतुराज पाटील (काँग्रेस)

  • कोल्हापूर उत्तर -मधुरिमाराजे छत्रपती (काँग्रेस)

  • करवीर- राहुल पाटील (काँग्रेस)

  • हातकणंगले-राजू आवळे (काँग्रेस)

  • शिरोळ - गणपतराव पाटील (काँग्रेस)

  • शाहूवाडी सत्यजित पाटील (ठाकरे सेना)

  • राधानगरी के. पी. पाटील (ठाकरे सेना)

  • चंदगड- डॉ. नंदिता बाभूळकर (राष्ट्रवादी शरद पवार)

  • कागल - समरजितसिंह घाटगे (राष्ट्रवादी शरद पवार)

  • इचलकरंजी-मदन कारंडे (राष्ट्रवादी शरद पवार)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT