Mahatma Jyotiba Phule Shetkari Karj Mukti Yojana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Abitkar: कोल्हापूरसाठी राज्य सरकारचा विशेष अध्यादेश, आबिटकरांच्या पाठपुराव्याने या शेतकऱ्यांना होणार लाभ

Mahatma Jyotiba Phule Shetkari Karj Mukti Yojana: प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील जाचक निकषांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हे अनुदान मिळण्यापासून वंचित राहत होते.

Rahul Gadkar

Kolhapur News : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमधून कोल्हापूर जिल्ह्यातील एका वर्षात 2 वेळा पीक कर्ज उचलणारे शेतकरी बांधव प्रोत्साहनपर अनुदान योजनेपासून वंचित राहत होते.

या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ व्हावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेत मागणी केली होती. या अनुषंगाने तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीस यश आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच वर्षात दोन वेळा पीककर्ज (Crop Loan) उचल करणाऱ्या शेतकरी बांधवांना महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनाचे प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 77 हजार शेतकरी बांधवांना 646 कोटी रुपये जमा करण्यात आले होते, परंतु कोविड-19 मुळे या योजनेस मर्यादा आली. प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील जाचक निकषांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी हे अनुदान मिळण्यापासून वंचित राहत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी हा कष्टाळू व प्रामाणिक असून, या शेतकऱ्यांमार्फत वेळेत कर्जाची परतफेड केली जाते. कोल्हापूर जिल्हा हा कर्ज परतफेडीमध्ये राज्यात आग्रेसर आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची बिले ही वेळत जमा होत नाहीत, तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक वर्ष हे 30 जून आहे.

या योजनेमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यातील के.डी.सी.सी. बँकेमध्ये (Kolhapur KDCC Bank) खाते असणारे शेतकरी आपल्या कर्जाची परत फेड 30 जूनपर्यंत करत असतो. यामुळे के.डी.सी.सी. बँकेतील शेतकऱ्यांची कर्जपरतफेड ही दोन वर्षामध्ये दिसत असल्यामुळे त्यांना या योजनाचा लाभ मिळत नव्हता.

यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनाचा लाभ व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश आले सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दि.5 मार्च, 2024 रोजी काढलेल्या शासन शुद्धिपत्रकामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ होणार असल्याचे सांगितले आहे. एकाच वर्षात 2 वेळा कर्ज उचल करणाऱ्या शेतकरी बांधवांनी सदर शासन निर्णयानुसार पाठपुरावा करून प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT