Vehicles stuck on the pothole-ridden Kolhapur Pune Highway where toll collection continues despite poor road conditions, sparking legal action by Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Pune Highway : कोल्हापूर-पुणे महामार्गावरील टोलपासून लवकरच दिलासा? राजू शेट्टी कोर्टात जाताच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसा जारी

Raju Shetti Petition : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही . त्यानुसार कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू यांनी दाखल केली.

Rahul Gadkar

Kolhapur News, 11 Sep : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाप्रमाणे जे रस्ते निकृष्ठ व खराब झाले असतील त्या रस्त्यावर टोल आकारणी करता येणार नाही . त्यानुसार कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्याने टोल आकारणी तातडीने बंद करावी अशी याचिका कोल्हापूर खंडपीठात माजी खासदार राजू यांनी दाखल केली.

कोल्हापूर सर्किट बेंचने याबाबत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत.

दोन आठवड्यापुर्वी केरळ राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या खराब रस्त्यांच्या दाखल झालेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची याचिका फेटाळून फटकारले होते. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी कोल्हापूर ते पुणे हा रस्ता अत्यंत निकृष्ठ झालेला असून जोपर्यंत रस्त्याची कामे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल आकारणी न करण्याची मागणी खंडपीठात केली आहे.

सदर याचिकेमध्ये राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, रस्ते विकास प्राधिकरणाचे सचिव त्याबरोबरच कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी केले आहे. कोल्हापूर ते पुणे या 240 किलोमीटरच्या महामार्गावर प्रवास करण्यासाठी ज्या ठिकाणी 3 तासात पोहचणे अपेक्षित असताना सध्या 7 तास लागत आहेत.

रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होवू लागले आहे. पावसाळ्यात प्रवास करताना अनेक मोठे अपघात झाले असून वाहतूकदारांना प्रचंड मनस्ताप होवू लागला आहे. कोल्हापूर खंडपीठाकडून मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान प्राधिकरणासह वरील सर्व विभागांना पुढील सुनावणीस हजर राहण्याबाबत नोटीसा लागू करण्यात आल्या आहेत.

सध्या कोल्हापूर ते पुणे या महामार्गावर दैनंदिन दीड ते दोन कोटी रूपयांची टोल वसुली केली जात आहे. मात्र वाहतूकदारांना सुविधा कोणत्याच दिल्या जात नाहीत. सदर याचिकेच्या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे या जिल्ह्यातील प्रवाशांना व वाहतूकदारांना दिलासा मिळणार असून या मार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या नजरा आता या याचिकेच्या निकालाकडे लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT