Shalarth ID Scam Swami Vivekanand Shikshan Sanstha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shalarth ID Scam: बनावट नियुक्तीपत्रांचा भांडाफोड; लिपिकाला अटक, पुण्यातील चार शिक्षिकांवर गुन्हा दाखल

Swami Vivekanand Shikshan Sanstha Shalarth ID Scam: कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शालार्थ आयडीसाठी बनावट नियुक्तीपत्रे आणि ठराव तयार केल्याप्रकरणी लिपिकाला अटक केली आहे. चार शिक्षिकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: संस्थेतील लिपिकाने चार शिक्षिकांना बोगस नियुक्तपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर लिपिकासह चार शिक्षिकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पुरंदर येथील शाखेमधील शिक्षिकांना ही पत्रे व ठराव दिल्याचे उघडकीस आले. नियुक्तीपत्रे व ठराव बनविणाऱ्या उमेश कल्लाप्पा शिंगे (वय ४२, रा. वडणगे, ता. करवीर) याला अटक केली असून, तीन दिवसांची कोठडी सुनावली. शिवाय चार महिला शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव सीताराम महारू गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्षिका प्रमिला नामदेव चव्हाण, उज्ज्वला महादेव चांदुगडे, प्रियांका शंकर पाटील, सरवतजहान तौफिक बागवान (सासवड, ता. पुरंदर, पुणे) यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

जुलै २०२३ ते जून २०२४ कालावधीत हा प्रकार घडला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या वेतनासाठी शिक्षकांना शालार्थ आयडी काढणे बंधनकारक असते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुरंदर येथे पुरंदर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना, असे आयडी काढण्यासाठी नियुक्तीपत्रे व ठराव देण्याचे आश्वासन लिपिक शिंगे याने दिले होते.

परस्पर नियुक्तीपत्रे अदा

संशयित लिपिक शिंगे याने संस्थेतील वरिष्ठांच्या परस्पर ११ जुलै २०२३ ला संस्थेच्या लेटरहेड, शिक्के वापरून प्रमिल चव्हाण, उज्ज्वला चांदुगडे, प्रियांका पाटील, सरवतजहान बागवान यांना नियुक्तीपत्रे बनवून दिली. यासाठी त्याने या शिक्षिकांकडून किती पैसे घेतले? याचा तपास पोलिस करीत आहेत.

उपसंचालकांकडे ठराव सादर लिपिक शिंगे याने बनवून दिलेली नियुक्तीपत्रे शिक्षिकांनी पुणे शिक्षण उपसंचालकांकडे सादर केली होती. संस्थेचे ठरावही दाखवत शालार्थ आयडी बनवून घेतले; पण हा प्रकार जुलै २०२४ मध्ये उघडकीस आला होता.

अखेर संस्थेच्या वतीने संशयित लिपिकासह चार शिक्षकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बनावट नियुक्तीपत्र, ठराव बनविल्याप्रकरणी अटक केलेल्या लिपिक शिंगे याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली. संस्थेतूनही त्याला निलंबित केले आहे. शिक्षकांचीही मान्यता रद्द केल्याचे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT