पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur viral audio clip : 'आप्पाचा विषय लय हार्ड हाय'! गोकुळच्या माजी अध्यक्षांना एका फोनवर पाडलं; कोल्हापुरात 'त्या' ऑडिओ क्लिपची तुफान चर्चा!

Kolhapur viral audio clip controversy : एका कथित ऑडिओ क्लिपमुळे आणि फोन कॉलमुळे गोकुळच्या माजी अध्यक्षांभोवती कोल्हापुरात मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. सविस्तर वाचा.

Rahul Gadkar

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील पाडळी खुर्द मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू सूर्यवंशी रिंगणात होते. याच निवडणुकीत गोकुळच्या राजकारणाचे पडसाद पाहायला मिळाले. मागील पाच वर्षांपूर्वी माझे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी महाडिक यांची साथ सोडल्यानंतर गोकुळ मध्ये सत्तांतर झाले.

तीस वर्षाची गोकुळ मधील महाडिक गटाची सत्ता खालसा करण्यामध्ये विश्वास पाटील यांचा प्रमुख सहभाग होता. त्यामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा पाटील यांच्यावर प्रचंड रोष होता. त्याचा बदला आता माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विश्वास पाटील यांच्या चिरंजीवाचा पराभव करून केल्याची चर्चा एका कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने होत आहे.

व्हायरल झालेल्या कॉल संभाषणामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आपल्या वाशीतील कार्यकर्त्याला फोनवरून राजू सूर्यवंशी यांना मदत करण्याची सूचना केली आहे. या संभाषणाची चर्चा निकालानंतर जोरदार सुरू आहे. सचिन पाटील यांचा पराभव झाल्यानंतर गोकुळच्या राजकारणातील उट्टे काढल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात सुरू आहे. संभाषणामध्ये मी महाडिक बोलतोय महाडिक! तुम्हाला राजू सूर्यवंशी माहिती आहे का? तो विश्वास पाटलाच्या उलट उभा राहिला आहे.

राजू मत म्हणजे बीड च्या महादेवाला मदत. सुहास पाटलाला मदत करून तुम्हाला समाधान मिळणार नाही. राजूला मदत करून तुम्हाला समाधान मिळेल. त्यामुळे "विश्वास पाटलांच्या उलटं काम तुम्हाला करायला लागतंय’ असे सांभाषण या व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आहे. या संभाषणामध्ये कार्यकर्ताही ‘होय साहेब.. त्यानुसार काम करतो.. तुमचा ‘शब्द’ पडू देत नाही’ असे आश्वासन देतो. तुमचे कुठलीही काम असेल तर कारखान्यावर यायचं. मी सगळी मदत करतो, असेही महाडिक म्हणतात.

दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची साथ सोडून विश्वास पाटील शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यासोबत गेले होते. शिवाय गोकुळच्या निवडणुकीत ही महाडिक गटाला विश्वास पाटील यांनी धक्का दिला होता. त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके आणि विश्वास पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र या निवडणुकीत विश्वास पाटील यांच्या चिरंजीवाचा पराभव झाला. हा पराभव नेमका का झाला याची कारण मीमांसा नरके गटाकडून देखील सुरू होती. मात्र निकालानंतर ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे आप्पा महाडिक यांनीच विश्वास पाटलांचा गेम केल्याची चर्चा सध्या मतदारसंघात जोरात सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT