Kolhapur News, 10 Jul : करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील 25 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी 23 कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या या आदेशामुळे जिल्हा परिषदेमधील संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार आणि अपहारप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळात समाविष्ट असणाऱ्या जिल्हा परिषद सेवेतील एकूण २३ कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
संशयित आरोपी ज्या संवर्गातील आहेत, त्या संवर्गाच्या खातेप्रमुख आणि कार्यालयप्रमुखांना तत्काळ विभागीय चौकशी सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. चौकशीच्या कचाट्यात सापडलेल्या २३ संशयित कर्मचाऱ्यांपैकी १४ जण सध्या जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत आहेत.
तर ९ जण सेवानिवृत्त झालेले आहेत. सेवानिवृत्त होऊन ज्यांना ४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला नाही, अशा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांकडील संपूर्ण दप्तराची सखोल पडताळणी करून, दोषारोप निश्चित करावेत.
करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेमध्ये २०१९ ते २०२४ या कालावधीत ४४८ हून अधिक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंदाजे २४ कोटी ६९ लाख रुपयांच्या ठेवी आणि नियमबाह्य गुंतवणूक असा एकूण २५ कोटी ६९ लाख ५१ हजार २७९ रुपयांचा प्रचंड मोठा अपहार झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.