Sangli Maratha Reservation : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासह सर कुणबी प्रमाणपत्र मिळावे; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Sangli Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी आज सांगलीत हजारो मराठा बांधवांचा क्रांती मोर्चा निघाला...

अनुराधा धावडे

Sangali Political News : मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी आज सांगलीत हजारो मराठा बांधवांचा क्रांती मोर्चा निघाला. एक मराठा, लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मागणीचा आवाज सांगलीतील चौकाचौकांत घुमवला. विशेष म्हणजे या आंदोलनाचे नेतृत्व महिलांनी केले. दरम्यान, मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानवी हल्ल्याच्या निषेधार्थ व मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सांगलीतील कर्मवीर क्रांतीसिंह पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मोर्चाला सुरुवात झाली. सरकारने या मोर्चाची दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अन्यथा राज्यभरात मराठा संतापून उठेल, असा इशारा देण्यात आला.

मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या

1) ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेत असलेल्या जातींचे फेरसर्वेक्षण करून या यादीतून प्रगत जातींना वगळण्यात यावे, राज्यातील ओबीसी जातींची संख्या व त्यांच्या लोकसंख्येची जनगणना करून सर्वेक्षण करा.

2) राज्यातील फुगीर आरक्षण कमी करून मराठा समाजाचा गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाजाचा 50% ओबीसीमध्ये समावेश करावा.

3) 19/12/2018 च्या शासन निर्णयामुळे समांतर आरक्षणअंतर्गत अन्याय झालेल्या PSI- 2017, RTO 2017 मधील महिलांना शासकीय सेवेत समावून घ्या. तसेच EWS TO PSI-2020, SEBC TO EWS महाराष्ट्र इंजिनिअरिंग, सार्वजनिक बांधकाम उमेद नियुक्त्यांचा प्रश्न सोडवा.

4) समांतर आरक्षण व खुला सर्वसाधारण गटात अर्ज, दावा आणि स्पर्धा करणाऱ्या उमेदवार प्रवर्गात समावेश करणारा कायदा बनवून ओपनमध्ये संरक्षण द्या.

(5) मराठा तरुणांच्या शैक्षणिक अडचणी व वसतिगृहाचे प्रश्न सोडवा

6) अण्णासाहेब पाटील सक्षम बनवून तरुणांना येणाऱ्या अडचणी सोडवा. 7 ) सारथी संस्थेला मनुष्यबळ व वाढीव निधी देऊन MOA नुसार सर्व योजना सुरू करा.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT