Vijay Auti vs Nilesh Lanke
Vijay Auti vs Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विजय औटींच्या पत्नीच्या विरोधात लंकेंनी दिले नवख्या नगरेंना तिकीट

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. आज ( बुधवारी ) उमेदवारी अर्ज छानणी झाली. पारनेर नगरपंचायत निवडणुकीतील अर्ज छानणीत 9 उमेदवारी अर्ज बाद झाले. यात विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी ( Vijay Auti ) यांच्या पत्नी शिवसेनेच्या जयश्री औटी लढत असलेल्या प्रभाग 9 मधील चार उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. या प्रभागात शिवसेनेच्या ( Shivsena ) जयश्री औटींच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी नवख्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. Lanke fielded an inexperienced candidate against Vijay Auti's wife

विजय औटी यांच्या पत्नी जयश्री औटी या प्रभाग 9 मधून निवडणूक लढविणार आहेत. त्या पारनेर पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत. प्रभाग 9 मध्ये 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील चार अर्ज छानणी प्रक्रियेत बाद झाले. त्यामुळे या प्रभागात उमेदवारी अर्ज छानणीनंतर सहाच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. या प्रभागात भाजपने उमेदवारच दिलेला नाही. त्यामुळे जयश्री औटींसमोर राष्ट्रवादीच्या उमेदवार हिमानी नगरे यांचे आव्हान असणार आहे. जयश्री औटींसमोरील सर्वच उमेदवार नवखे आहेत.

काल (मंगळवारी ) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. 13 प्रभागांसाठी 76 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज सकाळी 11 वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी उमेदवारी अर्ज छानणी प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेत एबी फॉर्म नसलेले सूचक प्रभागाबाहेरील असे 9 उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले.

यात प्रभाग क्रमांक 1मधील शीतल सुनील म्हस्के यांचा भाजपचा एबी फार्म न जोडल्याने, प्रभाग 5मधील भीमा बबन औटी यांनी राष्ट्रवादीचा एबी फार्म न जोडल्याने, प्रभाग 8 मध्ये शंकर ताराचंद नगरे अपक्ष यांनी एक सूचक प्रभागाबाहेरील असल्याने, प्रभाग 9मधील अमित हरिभाऊ जाधव यांनी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नसल्याने, विलास तुकाराम मते यांनी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नसल्याने, बाळासाहेब सुखदेव शेटे यांच्या अर्जासोबत राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नसल्याने, सचिन तुकाराम नगरे राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नसल्याने, प्रभाग 16 मध्ये रायभान दिनेश औटी यांच्या अर्जासोबत राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नसल्याने, प्रभाग 17 शारदा शिवाजी मगर यांनी भाजपचा एबी फॉर्म न जोडल्याने हे अर्ज छानणीत बाद ठरविण्यात आले.

या छानणी प्रक्रियेत प्रभाग 7मधील राष्ट्रवादीच्या उषा नामदेव खोसे यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेच्या उमेदवार विद्या गंधाडे यांनी हरकत घेतली. उषा खोसे यांना तीन आपत्य असल्याचे गंधाडे यांच्या वकिलांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांना सांगितले. मात्र भोसले यांना पुराव्या अभावी तक्रार फेटाळत खोसे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT