Solapur NCP Leader Meet Sharad Pawar
Solapur NCP Leader Meet Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : सोलापूर राष्ट्रवादीकडे घ्यायचा तर ‘या’ तीन मतदारसंघाची माहिती काढा : पवारांचा आदेश

प्रमोद बोडके

Solapur News: आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघ राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केल्यास काय परिस्थिती राहील?, शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट या विधानसभा मतदार संघात काय परिस्थिती असेल? याची चाचपणी करण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याची माहिती आहे. माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया आणि सुधीर खरटमल यांनी गुरुवारी (ता. ११ मे) मुंबईत पवार यांची भेट घेतली. (Leader of NCP in Solapur held a meeting with Sharad Pawar)

शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकताच सोलापू्रचा (Solapur) दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पंढरपूर आणि मोहोळ या विधानसभा मतदार संघातील अंदाज घेतला. सोलापूर लोकसभा मतदार संघ (Lok Sabha) राष्ट्रवादीकडे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी विठ्ठल कारखान्यावरील शेतकरी मेळाव्यात केली होती. या मागणीचा धागा पकडून शरद पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी चाचपणी सुरू केल्याचे दिसते. मुंबईमध्ये शरद पवार यांनी गुरुवारी अर्धा तास विविध विषयांवर चर्चा केली.

सोलापू्र लोकसभा मतदार संघातील चार मतदार संघाची माहिती काढण्याची जबाबदारी कोठे-बेरिया-खरटमल यांच्यावर सोपविण्यात आली असून येत्या आठवड्यात पुन्हा एकदा या नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे. बैठकीत मतदार संघातील स्थितीबाबत चाचपणी केली जाणार आहे.

राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्या पदाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. कोरोना महामारी, बाजार समित्यांच्या निवडणुका, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता यामुळे पक्षांतर्गत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका लवकरच सुरू होण्याचे संकेतही पवार यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT