पश्चिम महाराष्ट्र

'किरीट सोमय्यांना कोल्हापूरात येऊ द्या, त्यांना अडवू नका'

भारतीय जनता पक्षाचे (Bhartiy Janta Paksh) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) येत्या मंगळवारी (२८ सप्टेंबर) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

भारतीय जनता पक्षाचे (Bhartiy Janta Paksh) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) येत्या मंगळवारी (२८ सप्टेंबर) कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येणार आहेत. मात्र त्या दिवशी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल, असे कोणतेही काम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करु नका,असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (minister hasan mushrif) यांनी केले आहे. तसेच, दौऱ्यात कुठेही सोमय्या यांना अडवू नये, त्यांच्या दौऱ्यात जे गोंधळ घालतील ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांना कोल्हापुर जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात आली होती. ते मुंबईहून कोल्हापूरला जात असताना त्यांना साताऱ्यातील कराड मधूनच माघारी पाठवण्यात आले होते. याबाबत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ' किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत माझ्यावर दोन आरोप त्यांनी माझ्यावर केले, मात्र आरोप करण्यापूर्वी त्यांनी साखर कारखानदारीविषयी वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक होते.. चुकीची माहिती देणाऱ्यांकडून माहिती घेऊन दहा वर्षांपूर्वीच्या प्रकरणावर आरोप करणे, अयोग्य आहे.''

त्यानंतरही मी किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरात येण्याचे आवाहन केले होते. कोल्हापूर जिल्ह्यात आमचे राजकीय, सामाजिक आणि सहकारातील काम पहा. स्थानिक पातळीवर भाजपची काय परिस्थिती आहे याबाबतही त्यांनी माहिती घ्यायला हवी. राजकीय जीवनात नाव मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना पंचवीस-तीस वर्षे लागतात. पण सोमय्या यांच्यासारखे कोणीतरी आरोप आमच्या राजकीय चारित्र्यावर शिंतोडे उडवत असतील तर ते अयोग्य आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

विशेष म्हणजे, गडहिंग्लज साखर कारखान्याबाबत त्यांनी जे आरोप केले होते, त्या आरोपाची चौकशी केली तर चौकशी यंत्रणाच कंपनीचा सत्कार करेल, याचे कारण म्हणजे कंपनीने आठ वर्षे हा कारखाना तोट्यात चालविला. यामध्ये आपला कोणताही संबंध नाही, असेही मुश्रीफ यांनी नमुद केलं. तसंच, कोल्हापूरला येणाऱ्या सोमय्या यांना अडवायचे नाही. त्यांना जिथे फिरायचे तिथे फिरूदे. पण सोमय्या यांनी जिल्ह्यात फिरताना जिल्ह्यातील भाजपच्या वस्तूस्थितीचीही दखल घ्यावी, असा खोचक टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

तर दूसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शब्दापुढे राष्ट्रवादीता एकही कार्यकर्ता जाणार नाही. सर्व कार्यकर्ते सयंम राखतील. परंतु सोमय्या यांनी, शब्द जपून वापरावेत, आरोप करताना अपमान होणार नाही याचे भान ठेवावे, असा इशारा शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT