सोलापूर महापालिका निवडणुकीतील उमेदवारीवरून आमदार विजयकुमार देशमुख व सुभाष देशमुख नाराज असून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी देशमुखांचा राग तात्पुरता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष संपर्कात असल्याने तो कमी होईल, असा दावा केला.
उद्धव-राज ठाकरे युती, घराणेशाही आणि अकलूजमधील राजकीय बदलांवर महाजन यांनी भाजपची भूमिका ठामपणे मांडली.
Solapur, 27 December : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपची उमेदवारीवरून आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे प्रचंड नाराज झाले आहेत. त्यांनी निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते ज्या पक्षातून निवडणूक लढवतील, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू, असे दोन्ही देशमुखांनी म्हटले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. त्यांना थोडा राग आला असेल, पण त्यांचा राग कमी करू, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दोघांच्याही संपर्कात आहेत, असे महाजनांनी म्हटले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष फत्तेसिंह माने देशमुख यांच्यासह देशमुख आणि माने कुटुंबीयाने आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन यांनी सोलापुरातील वादावर भाष्य केले.
सोलापूर महापालिका निवडणुकीत शहर उत्तर मतदारसंघात कोठे समर्थकांना उमेदवारी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज झाले आहेत. त्यातून त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यानंतर सोलापूर भाजपमध्ये मोठा गदारोळ उठला आहे. त्यावर जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे दोघे निष्ठावंत आहेत. ते कुठेही जाणार नाहीत. त्यांना थोडा वेळ राग असतो. कालांतराने दोघांचाही राग कमी करू. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दोघांच्याही संपर्कात आहेत
उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीबाबत गिरीश महाजन म्हणाले, नक्कल करणे फार सोपे असते; परंतु बाळासाहेबांच्या विचाराला त्यांनी तिलांजली दिली आहे. वास्तविक आमच्या १०५ जागा होत्या. तरीसुद्धा त्यांनी स्वार्थापायी युती तोडली आहे. बाळासाहेबांची स्टाईल मारणे सोपे आहे. परंतु विचार अंगिकारणे अवघड आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नव्हते. मंत्रालयात अडीच वर्षांत फक्त चार वेळा आले होते.
मुंबई महापालिका निवडणुकीचे घोडामैदान लांब नाही. उद्धव आणि राज एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही, हे लक्षात येईल. मुंबईमध्ये त्यांची २५-३० वर्षे सत्ता होती. मुख्यमंत्री फडणीस यांच्यामुळे मुंबईची चौफेर प्रगती सुरू आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही.
रणजितसिंह मोहिते पाटलांच्या गैरहजेरीबाबत भाष्य...
अकलूजच्या नगर परिषद निवडणुकीत बदल झाला आहे. भाजपच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला दहा हजार मते मिळालेली आहेत. आपणास पडलेली दिसले. घराणेशाही संपलेली दिसेल. भाजपचे विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील हे आजच्या कार्यक्रमाला नसल्याचे काहींनी निदर्शनास आणले असता ते म्हणाले, त्यांना निमंत्रण मिळाले नसेल. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Q1. देशमुख बंधू भाजपवर का नाराज आहेत?
महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत.
Q2. या नाराजीवर गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली?
हा राग तात्पुरता असून तो लवकरच कमी केला जाईल, असे महाजन म्हणाले.
Q3. उद्धव-राज ठाकरे युतीबाबत महाजन काय म्हणाले?
बाळासाहेबांचे विचार सोडून स्वार्थासाठी युती केल्याचा आरोप त्यांनी केला.
Q4. अकलूज नगरपरिषद निवडणुकीबाबत महाजनांचा दावा काय आहे?
भाजपला दहा हजार मते मिळून घराणेशाही संपत असल्याचे चित्र दिसत असल्याचे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.