Karad City Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : कराडमधील जनजीवन पूर्वपदावर; दक्षतेसाठी पोलिस बंदोबस्त कायम

Karad city पुसेसावळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर येथे शहरात तणावपूर्ण शांतता होती त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला

Umesh Bambare-Patil

-हेमंत पवार

Karad News : पुसेसावळी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड येथे असणारा तणाव आज पूर्णपणे निवळला. त्यामुळे जनजीवन पूर्ववत झाले असून व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. प्रशासन व पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दक्षतेसाठी पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

पुसेसावळी Pusesavali येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर येथे कराड शहरात Karad City तणावपूर्ण शांतता होती. त्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान दोन दिवस शाळा ही बंद होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून होते.

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ शहर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे व सहकाऱ्यांनी परिसरातील अल्पसंख्यांक समाजाची व शांतता समितीची बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांनी शांततेचे व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन केले होते.

त्याला प्रतिसाद देत कराड शहरासह तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज तिसऱ्या दिवशी शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाली असून जनजीवन पूर्वपदावर आले आहे दरम्यान तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त आजही कायम ठेवण्यात आला आहे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT