BRS Joy festival in Satara sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara BRS News : कर्जमाफी तेलंगणात.. आनंदोत्सव साताऱ्यात...

Maharashtra Government महाराष्ट्र सरकारने आता तरी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी अपेक्षा बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Umesh Bambare-Patil

Satara BRS News : तेलंगणातील शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली. याचा भारत राष्ट्र समितीच्यावतीने सातारा व कराडमध्ये फटाके वाजवून साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच महाराष्ट्र सरकारने आता तरी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी व शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

तेलंगणातील शेतकऱ्यांची १९ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा तेथील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव K Chandrashekhar Rao यांनी केली. याचा भारत राष्ट्र समितीच्यावतीने BRS साताऱ्यात फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारत राष्ट्र समितीचे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांच्या सूचनेनुसार समितीचे साताऱ्याचे नेते सागर भिसे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यकर्त्यांनी नागरीकांना पेढे वाटप केले. या वेळी गणेश जगताप, राहूल कमाने, रवी जगताप, सनी काटे, त्रिलोक कांबळे, अशोक भोसले, सुधीर गायकवाड, विकास मोहिते उपस्थित होते.

कराडला भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक विश्वास जाधव, कऱ्हाड दक्षिण समन्वयक उत्तमराव खबाले, रामचंद्र पाटील, दिलीप जाधव, सुभाष गरुड, आप्पा पाटील, रामचंद्र माने, निवास माने, सागर कांबळे आदींनी येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन तेलंगणातील कर्जमाफीचा फटाके वाजवुन, साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला.

महाराष्ट्र सरकारने आता तरी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी व शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, अशी अपेक्षा विश्वास जाधव यांनी व्यक्त करुन जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा दुसरा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT