Sangli Election Result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Election Result : जयंत पाटलांकडून भाजपचा धुव्वा, पण आरआर आबांच्या लेकाला धक्का; पडळकर, कदमांनी दाखविली ताकद

Local body election results Maharashtra : आष्टा नगरपरिषदेत आमदार जयंत पाटील व दिवंगत आमदार विलास शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवली.

सरकारनामा ब्यूरो

Jayant Patil vs BJP : जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतींची मतमोजणी रविवारी झाली. जिल्ह्यातील सर्वांत चर्चेची ठरलेल्या उरुण ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये भाजपचा धुव्वा उडाला. तर विटा नगर परिषदेमध्ये गेली ५० वर्षे असलेल्या सदाशिवराव पाटलांच्या सत्तेला आमदार सुहास बाबर यांनी सुरुंग लावत विटा नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन केली.

पश्चिम महाराष्ट्रात चर्चेची ठरलेल्या व जयंत पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेलया होम पिचवरील उरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप मित्रपक्षांचा दारुण पराभव झाला. जयंत पाटील यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मालगुंडे साडेसात हजार मतांनी विजयी झाले. तर नगरसेवकांच्या 30 पैकी 23 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.

तासगाव नगर परिषदेत आमदार रोहित पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांची स्वाभिमानी आघाडी अशी लढत झाली. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. माजी खासदार संजय पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीने तासगाव नगर परिषदेची सत्ता मिळवली. तर पलूस नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता आली. आमदार विश्वजीत कदम यांनी गड राखला. जत नगर परिषदेत भाजपची सत्ता आली.

आटपाडी नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम जाधव यांच्या रूपाने भाजपाने झेंडा फडकवला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा धोबीपछाड दिला.

आष्टा नगरपरिषदेत आमदार जयंत पाटील व दिवंगत आमदार विलास शिंदे यांच्या आष्टा शहर विकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवली.  नगराध्यक्षपदासहित 24 पैकी 23 जागावर एकतर्फी विजय मिळवला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशाल शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचे निकटवर्तीय प्रवीण माने यांचा पराभव केला. विरोधी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एकमेव संजय सावंत विजयी झाले.

कोणत्या ठिकाणी नगराध्यक्ष?

जत - भाजप, विटा - शिवसेना शिंदे गट, आटपाडी - भाजप, आष्टा - स्थानिका आघाडी, तासगाव - स्वाभिमानी आघाडी, पलूस - काँग्रेस, ईश्वरपूर - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिराळा - शिवसेना शिंदे गट.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT