sanajaykaka patil gopichand padalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 2019 मध्ये बघून घेण्याची भाषा अन् आव्हान, आता पडळकर लावणार संजयकाकांसाठी ताकद

Sangli Lok Sabha Election 2024 : गतवेळी खासदार संजय पाटील यांना वंचितमधून गोपीचंद पडळकर यांनी तगडे आव्हान दिले होते.

सरकारनामा ब्युरो

- नागेश गायकवाड

पाच वर्षांपूर्वी खासदार संजय पाटील ( Sanjay Patil ) आणि आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) लोकसभेच्या आखाड्यात एकमेकांच्या विरोधात जिवाची बाजी लावून लढले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर भाजपच्या मतदारसंघाच्या प्रमुखपदी असल्याने संजय पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी पडळकर यांच्यावर आहे. ती त्यांना पेलवून दाखवावी लागणार आहे. त्यासाठी ते किती ताकद लावणार आणि त्यांचे कार्यकर्ते किती जोशात पळणार, यावर संजय पाटील यांच्या मतांची आकडेवारी ठरणार आहे.

गतवेळी खासदार संजय पाटील ( Sanjay Kaka Patil ) यांना वंचितमधून गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी तगडे आव्हान दिले होते. त्याला त्या दोघांतील अंतर्गत वादाची झालर होती. लोकसभेच्या अगोदर दोन वर्षांपासून त्यांच्यात एका पक्षात असतानाही संघर्ष चालू होता. दोघांकडूनही एकमेकावर विखारी टीका केली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पडळकरांना तासगावात येऊन दाखवण्याचे आव्हान दिले. ते पडळकर यांनी स्वीकारले होते. तो दोघांच्यातील कडवा संघर्ष मतदार आणि कार्यकर्त्यांनी बघितला आहे. आत्ता चित्र बदलले आहे. गेल्या तीन वर्षांपासून दोघांचे सूर जुळलेत. पडळकर यांच्याकडे भाजपने मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. तर पाटील यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे पडळकर यांच्यावर मतदारसंघातून संजय पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे ते पाटील यांच्यासोबत प्रचारात निश्चित असणार आहेत. गतवेळी पडळकर यांनी पहिल्या क्रमांकाची आणि पाटील यांनी दुसऱ्या क्रमांकाची तालुक्यात मते घेतली होती. सध्या पडळकर पाटील यांच्यासोबत असल्याने तालुक्यातून मोठ्या मताधिक्याची अपेक्षा आहे.

( Edited BY : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT