Dhananjay Mahadik, Sanjay Mandlik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : महाडिकांनी वाढवलं मंडलिकांचं टेन्शन; कोल्हापूरच्या आखाड्यात भाजप-सेनेची कुस्ती

Sanjay Mandlik News : संजय मंडलिक यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार की कोल्हापूरची जागा भाजपकडे जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) महायुतीचा उमेदवार कोण असणार, याबाबत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. कोल्हापूरची जागा शिवसेनेला जाणार की भाजपला, याबाबत अजूनही संभ्रम असताना भाजप नेत्यांसह शिवसेनेच्या विद्यमान खासदारांनी शड्डू ठोकला आहे. मात्र, अधिकृत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, हे चार ते पाच दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सूचक वक्तव्य करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विद्यमान खासदारांचे टेन्शन वाढले आहे. 

महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी लोकसभा उमेदवारीवर (Lok Sabha Election News) बोलताना थेट मंडलिकांच्या बंडखोरीवर भाष्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात (Kolhapur) महायुतीत सगळं आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही जागा भाजपच्या वाट्याला जाणार का, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे मंडलिकांचं (Sanjay Mandlik) टेन्शन वाढलं आहे. 

काय म्हणाले महाडिक?

आत्तापर्यंत तरी कोल्हापूरची जागा बदलाबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगताना महाडिक म्हणाले, जागाबदलाचा निर्णय मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते घेतील. खासदार संजय मंडलिक हे समंजस व्यक्तिमत्त्व आहे. ते बंडखोरी करतील असे वाटत नाही.

बंडखोरी झाली तर वरिष्ठ नेते ते थांबवतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांची पारख व जाण असणारे नेते आहेत. निश्चितच ते मंडलिक यांच्या भविष्याची चिंता करतील. बंडखोरी होणार नाही असा मला विश्वास आहे, असे सूचक विधान धनंजय महाडिक यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

साडेतीन लाखांनी होणार विजय

महायुतीचा (Mahayuti) उमेदवार मागील निवडणुकीत अडीच लाखांच्या मतांनी निवडून आला होता. यंदा साडेतीन लाखांच्या मतांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास महाडिकांनी व्यक्त केला. एकीकडे मंडलिक बंडखोरी करणार नाहीत, असे महाडिक म्हणत असताना दुसरीकडे मताधिक्यावरही भाष्य करताना दिसत आहेत. त्यामुळे महाडिक आणि भाजपच्या (BJP) मनात नेमकं काय चाललंय, हे पुढील चार-पाच दिवसांतच स्पष्ट होईल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT