raju shetti uddhav thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : 'मशाल हाती घेणे कदापि शक्य नव्हते, म्हणून...' ; ठाकरेंच्या भेटीतली 'अंदर की बात' शेट्टींनी सांगितली!

Raju Shetti News : शेतकऱ्यांना आणि चळवळीला वाऱ्यावर सोडणार नाही, शेट्टींनी ठणकावले

Rahul Gadkar

Hatkanangale News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'गेल्या 30 वर्षांपासून मी शेतकरी चळवळीत आहे. माझ्या आयुष्यात कोणत्याही राजकीय पक्षासोबत काम केलेले नाही. मी शेतकरी चळवळ म्हणून पुढे नेत आहे. आता मी व्यक्तिगत फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, संघटनेला वाऱ्यावर सोडून मी मशाल हातात घेणार नाही. या निवडणुकीला मी जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या जोरावर एकटाच सामोरे जात आहे,ट अशी घोषणा शेट्टी यांनी केली. (Lok Sabha Election 2024)

'एफआरपी'मध्ये तीन तुकडे केल्यानंतर आणि भूमी अधिग्रहन कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या जीवनावर वरवंटा फिरवल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली. या धोरणात्मक बाबीला विरोध करून स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीच्या कार्यकारीणी समितीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अधीन राहून स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी आमची तीन वर्षांपासून सुरू होती, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीतील मत विभाजनामुळे महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला होता. हे मत विभाजन आम्ही टाळण्यासाठी महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा, असा विचार राज्य कार्यकारणीच्या समितीतून पुढे आला. त्यावरूनच मी गेल्या काही दिवसात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन वेळा भेट घेतली, असेही शेट्टी म्हणाले. |

"लोकसभा मतदारसंघातील वास्तवता आणि परिस्थिती मी त्यांच्यासमोर मांडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका काय असणार? हेदेखील मी त्यांच्यासमोर मांडली. मात्र त्यापूर्वी महाविकास आघाडीचे नेते हातकलंगले लोकसभा मतदारसंघाची जागा स्वाभिमानीला सोडणार असल्याचे जाहीर करत होते, त्यामुळेच मी ठाकरे यांची भेट घेतली होती," असे शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले.

"मी महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) येणार नाही, पण महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्यास महायुतीच्या उमेदवाराचा पराभव शक्य आहे. ही भूमिका घेऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो होतो. ही भूमिका त्यांनाही पटली होती. त्याबाबत लवकरच भूमिका घेऊ, असं त्यांनी जाहीरपणे मला सांगितलं होतं. मात्र काही दिवसांनी त्यांच्याकडून निरोप आला की तुम्ही मशाल चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जा. पण मशाल हाती घेणे म्हणजे मी शिवसेनेत प्रवेश करणे. पण ते कदापि शक्य नसल्याचं मी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं, अशी स्पष्टोक्ती राजू शेट्टी यांनी दिली.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT