Lok Sabha Election 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर केले. आघाडीतील सर्व पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जातील, असे नेत्यांनी जाहीर केले. पण सांगली आणि भिवंडीच्या जागेवर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता बळावली आहे.
प्रामुख्याने सांगलीसाठी काँग्रेसचे नेते खूपच आग्रही होते. या जागेवर पक्षाने पाणी सोडल्यानंतर नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून, सांगलीत पक्षाच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (Vishal Patil News in Marathi)
सांगलीमध्ये काँग्रेस (Congress) नेते विशाल पाटील यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. पण ही जागा आता शिवसेनेला (उद्धव ठाकरे) (Shiv Sena) गेली आहे. चंद्रहार पाटील यांना आधीच उमेदवारीही जाहीर झाली आहे. ही जागा काँग्रेसलाच मिळावी, यासाठी आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी दिल्लीवारीही केली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.
आज आघाडीच्या पत्रकार परिषदेपूर्वी विशाल पाटील यांनी एक्स हँडलवर गुढी उभारल्यानंतरचा कुटुंबाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच या नव्या वर्षात नकारात्मकतेवर मात करीत नवी आव्हाने, नव्या जबाबदाऱ्या पेलण्यास सज्ज होतोय, असेही त्यामध्ये म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सांगलीची (Sangli Constituency) जागा शिवसेनेला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विशाल पाटलांसह इतर नेतेही नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. तसेच उद्या सांगली काँग्रेसच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कदमांसह विशाल पाटील, विक्रम सावंत व जिल्ह्यातील पक्षाचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे काँग्रेससह शिवसेनेचेही लक्ष राहणार आहे.
आता लढाई जनतेच्या कोर्टात
विशाल पाटील यांना आघाडीची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. ‘आमचं काय चुकलं? आता लढाई जनतेच्या कोर्टात’, असं या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे विशाल पाटील या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. असे झाल्यास आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.