Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar On Madha : पक्ष फोडणाऱ्यांनी आमचा उमेदवारच पळवला; माढ्यावरून शरद पवारांचा भाजपला टोला

Sunil Balasaheb Dhumal

Satara Political News : माढा लोकसभेच्या तिढ्यावर शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. आम्ही या मतदारसंघातून धनगर समाजातील महादेव जानकर या नेत्याला उमेदवारी देण्याचे जाहीर केले होते. पण, काय झालं माहिती नाही. आतापर्यंत पक्ष पळवितात हे माहिती होते, त्यांनी हा उमेदवारच पळवला अशी मिश्किल टिप्पणी करत खासदार शरद पवार यांनी महायुतीवर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार (Sharad Pawar) शुक्रवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, सुनील माने, डॉ. सुरेश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी माढा मतदारसंघातील तिढ्यावर खासदार शरद पवार यांनी भाष्य केले. पवार म्हणाले, माढा मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या अधिक आहे. त्यानुसार त्यांच्यातील नेत्याला प्रतिनिधीत्व मिळावे म्हणून येथील जागा या समाजातील महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना देण्याचे जाहीर केले होते. त्यांच्याशी चर्चा देखील झाली होती, असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जानकर महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता होती. शरद पवारांची त्यांनी भेटीही घेतल्या होत्या. तसेच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysingh Mohite Patil) यांच्याशीही चर्चा केली होती. मात्र अचनाकच त्यांनी महायुतीत राहणार असल्याचे स्पष्ट झाले. यावर पवार म्हणाले, जानकरांशी चर्चा सुरू होती. मात्र मध्येच काय झाले माहिती नाही. आतापर्यंत पक्ष पळवितात हे माहिती होते. आता मात्र त्यांनी हा उमेदवार पळवल्याचे दिसते, असा टोला लगावला.

माढा लोकसभेसाठी आमच्याकडे अनेक उच्च शिक्षित लोक इच्छुक आहेत. त्यामुळे येथील उमेदवारी देताना सामाजिक भान ठेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचेही पवारांनी सूचक विधान केले आहे. दरम्यान, धैर्यशिल मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) भाजपमध्ये बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. यावर छेडले असता पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांशी लोकसभेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT