udayanraje bhosale Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : उदयनराजेंचा किती लाखांनी पराभव होणार? पृथ्वीराज चव्हाणांनी थेट आकडाच सांगितला

Prithviraj Chavan On Narendra Modi : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराडमध्ये येऊन 10 वर्षाचा हिशोब द्यावा," असं आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.

Akshay Sabale

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघात ( Satara Lok Sabha Constituency ) खासदार छत्रपती उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) यांच्यात काँटे की टक्कर होत आहेत. साताऱ्यात उदयनराजे की शशिकांत शिंदे जिंकणार याची उत्सुकता लागली आहे. दोन्ही बाजूंकडून स्टार प्रचारकांच्या सभा सुरू असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे.

"2019 च्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांचा 90 हजारांनी पराभव केला होता. आता दीड लाखांच्या फरकानं उदयनराजे भोसले यांचा पराभव होईल," असं भाकीत पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी वर्तवलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

"2019 मध्ये उदयनराजेंचा 90 हजारांनी पराभव"

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "2019 मध्ये उदयनराजे राष्ट्रवादीत होते. आम्ही त्यांचा प्रचार केला. त्यांच्याबद्दल चांगला प्रचार केला. नंतर उदयनराजे भाजपत जाऊन निवडणूक लढले. तेव्हा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष एकत्र असताना आम्ही उदयनराजेंचा 90 हजारांनी पराभव केला. आता शिवसेनाबरोबर असल्यानं तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे किमान दीड लाखांच्या फरकानं उदयनराजेंचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही."

"400 पार सोडा मोदी सत्तेतच येणार नाहीत"

"भाजपनं 400 पार पेक्षा 500 पारची घोषणा का दिली नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कराडमध्ये येऊन 10 वर्षाचा हिशोब द्यावा. पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलत आहेत. पण, तुमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात काय केलं? हे सांगत नाहीत. 400 पार खासदार येणार असतील, तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याचं कारण काय? 400 पार सोडा मोदी सत्तेतच येणार नाहीत," असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

"यंदा मोदींना पराभूत करायचं ठरवलं"

"नरेंद्र मोदी यांनी कितीही धावपळ आणि कितीही सभा घेतल्या, तरी आता मोदी यांचं काय खरं नाही. 2014 साली जनतेनं काँग्रेसला पराभूत करायचं ठरवलं, तसं यंदा मोदींना पराभूत करायचं ठरवलं आहे," असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT