vishal patil Vishwajeet Kadam
vishal patil Vishwajeet Kadam  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil News : ही दोस्ती तुटायची नाही, माझं विमान पायलटनं दिल्लीला लॅण्ड केलंय; विशाल पाटलांचं विधान

Akshay Sabale

Sangli News, 17 May : माझा दोस्त दिलदार आहे. त्यामुळे मला शत्रूकडे बघावं लागत नाही. माझा दिलदार मित्र माझ्या मदतीला येणार होता आणि आलेला आहे. हे संजयकाका पाटील यांना चार तारखेला दिसेल. पण, आमची ही दोस्ती तुटायची नाही. आमच्या एकीची एक्स्प्रेस मला दिल्लीला घेऊन जाईन. माझं विमान आमच्या पायलटनं दिल्लीला लॅण्ड केलंय. सांगली जिल्ह्यातील अडचणी विश्वजित कदम ( Vishwajeet Kadam ) यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागतील, असा विश्वास अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

"संजयकाकांच्या ( Sanjay Kaka Patil ) अहंकारातून दमदाटीची भाषा येत आहे. त्याच अहंकारातून त्यांचा पराभव होणार आहे," असा हल्लाबोल विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी केला आहे. त्यासह दोन लाखांच्या मतांनी निवडून येणार, असंही विशाल पाटील यांनी म्हटलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशाल पाटील म्हणाले, "संजयकाकांचा ज्योतिष शास्त्रावर खूप विश्वास आहे. त्यामुळे मीच निवडून येणार, असा फाजिल आत्मविश्वास त्यांना येत आहे. संजयकाकांकडून सामान्य जनतेची पत्रिका पाहणं राहून गेलं. जनतेच्या नशिबात आता बदल आहे. हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नको, हे जनतेच्या पत्रिकेत आहे. चार तारखेला मी दोन लाखांहून अधिक मतांनी निवडून येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि शहरात मी आघाडी घेईन. तासागावात सुद्धा संजयकाकांपेक्षा जास्तीचं लीड घेणार आहे."

"मावळते खासदार संजयकाका वैफल्यग्रस्त झालेत. सांगलीत नुरा कुस्ती व्हावी म्हणून संजयकाकांनी दिलदार शत्रूबरोबर बसून एक षडयंत्र रचलं होतं. जाणूनबुजून कमकुवत उमेदवार द्यावा आणि त्यातून संजयकाकांचा विजय होईल, असं त्यांना वाटत होतं. पाच ते सहा लाखांनी निवडून येऊ या कॉन्फिडन्समध्ये संजयकाका फिरत होते. मात्र, जनतेनं मला दिलेल्या प्रतिसादांनी संजयकाकांचा मूड खराब झाला आहे. तो अजूनही खराब आहे. संजयकाकांचा राहिलेला फाजिल आत्मविश्वासही जाणार आहे. मला त्यांची काळजी वाटते," असा टोला विशाल पाटील यांनी संजयकाका पाटील यांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT