Vinayak Patil J sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Loksabha : चंदगडमध्ये काँग्रेसला मिळाली 'पॉवर', महायुतीची डोकेदुखी वाढणार

Rahul Gadkar

Loksabha Election 2024 : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे. महायुतीचे मदार असणाऱ्या चंदगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळालेल्या आश्वासक चेहऱ्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढलं आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणारे विनायक ऊर्फ आप्पी पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील ( Satej Patil)आणि युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात विनायक ऊर्फ आप्पी पाटील यांचे निर्णयक प्राबल्य आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे ते माजी उपाध्यक्ष राहिले आहेत. सर्वसामान्यांची नाळ जुळलेल्या आप्पे पाटील यांची भूमिका ही चंदगड विधानसभा मतदारसंघात महत्त्वाची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडी (VBH) कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आप्पी पाटील यांनी जवळपास 43 हजार मते घेऊन आपले शक्ती दाखवून दिली होती. महायुतीकडून आमदार राजेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अशोक चराटी, शिवाजीराव पाटील हे मातब्बर नेते असताना महाविकास आघाडीला आप्पी पाटील यांच्या रूपाने चंदगडमध्ये बळ मिळाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आप्पी पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची बोलले जाते.

2019 विधानसभा निवडणुकीत पडलेली मतं

राजेश पाटील (राष्ट्रवादी) - 54 हजार 851

शिवाजी पाटील (भाजप बंडखोर) - 50 हजार 920

आप्पी पाटील (वंचित बहुजन आघाडी)- 43 हजार 839

संग्रामसिंह कुपेकर (शिवसेना) - 32 हजार 782

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT