Satara Loksabha News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर झाली. यामध्ये साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे NCP विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे अशी चुरशीची लढत होणार आहे. येत्या 15 एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शशिकांत शिंदे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. Latest update on satara loksabha election
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे BJP राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. आता त्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे सुरु केले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजेंच्या Udayanraje Bhosale विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु होत्या. आज अखेर शरद पवारांनी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव आहे. आजच्या यादीत सातारा व रावेर लोकसभा मतदारसंघाचे Satara Loksabha constituency उमेदवार घोषित केले आहेत.
आतापर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 9 उमेदवार घोषित झाले आहेत. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा थेट सामना होणार आहे.
उद्या आमदार शशिकांत शिंदे यांचे मुंबईहुन आगमन होणार असून जिल्हातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.
शशिकांत शिंदे हे मूळचे जावळी तालुक्यातील हुमगावचे आहेत. आमदार शिंदे पदवीधर असून माथाडी कामगारांचा नेता म्हणून परिचित आहेत. 1999 मध्ये ते प्रथम जावळीतून राष्ट्रवादीचे आमदार झाले. त्यानंतर ते जलसंपदा मंत्रीही होते.
आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि त्यानंतर आमदार शालिनीताई पाटील यांचा कोरेगावमध्ये येऊन पराभव केला होता. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन पंचवार्षिक आमदार होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील पक्षप्रतोद आहेत. राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष आहेत. तसेच सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनता दरबार घेण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. (who Is shashikant Shinde?)
सामान्य परिस्थितीतून येऊन राजकारणाच्या इतक्या उंचीवर जाणारे शिंदे यांनी विधानसभेतही आपल्या आक्रमक भाषणांनी वेगळी ओळख बनवली आहे. माथाडी संघटनांवर त्यांचा दबदबा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणातील महत्त्वाचा मोहरा व संघर्ष योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे.
Edited By : Rashmi Mane
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.