Devendra Fadnavis, Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : भाजपला किती जागा मिळणार? जयंत पाटलांनी आकडाच सांगितला

BJP : जयंत पाटील यांनी भाजपला 2019 च्या निवडणुकीत 37 टक्के मते होती. ती या निवडणुकीत 32 ते 33 टक्क्यांपर्यंत खाली

Roshan More

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. चार जूनला मतमोजणी होणार आहे. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी भाजपला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. तर, संजय राऊत Sanjay Raut यांनी महाविकास आघाडी 45 जागा जिंकत असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप किती जागा जिंकणार? हे सांगितले आहे.

'महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपला 12 ते 15 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत', असा दावा जयंत पाटील Jayant Patil यांनी केला आहे. हातकंणगले मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या आभार सभेत हा दावा केला. या दाव्यासोबत जयंत पाटील यांनी देशाच्या सत्तेतून भाजपला BJP कसे रोखायचे याचे गणित देखील मांडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप यंदाच्या निवडणुकीत 40 टक्के मते मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्याच जोरावर भाजपने चारशेपारचा नारा दिला होता. मात्र, जयंत पाटील यांनी भाजपला 2019 च्या निवडणुकीत 37 टक्के मते होती. ती या निवडणुकीत 32 ते 33 टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास देशाच्या सत्तेतूनही भाजपला खाली खेचता येईल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

अजित पवारांनी बोलवली बैठक

प्रत्येक पक्ष आपल्याला किती जागा मिळणार याचा अंदाज बांधतो आहे. त्यानुसार पुढील रणनीती निश्चित करतो आहे. याच दृष्टीने राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) त्यांचे उमेदवार ज्या जार जागांवर लढले. त्यातील बारामती, शिरुर, रायगड या मतदारसंघात काय चित्र असेल याबाबतचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यानुसार पक्षाची पुढची रणनिती काय असावी? यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.24) मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT