Raosaheb Danve removing mehndi at Akshay Kardile's wedding. With Dr. Sujay Vikhe Patil, Shivaji Kardile etc.
Sarkarnama
अहमदनगर : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले ( Shivaji Kardile ) यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांचे उद्या ( बुधवारी ) लग्न आहे. त्यासाठी दानवे हे नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर येथे आले आहेत. Lotus Mehndi on the hands of Union Minister Danve
अक्षय कर्डिलेंचे उद्या बुऱ्हाणनगर येथे लग्न होणार आहे. या लग्नासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे सुद्धा आज पासूनच आले आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अक्षय कर्डिले यांच्या विवाहानिमित्त मेहंदी कार्यक्रमास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनाही हातावर मेहंदी काढण्याचा मोह आवरला नाही.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी आज बुऱ्हाणनगर येथे भेट देऊन अक्षय कर्डिले यांना शुभेच्छा दिल्या. अक्षय यांचा मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना मंत्री दानवे यांनीही हातावर मेहंदी काढली. भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाची नक्षी मेहंदीतून त्यांनी काढून घेतली. तसेच गाण्यांवर ठेका धरत नृत्यही केले.
यावेळी माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खासदार सुजय विखे, उद्योजक राजेंद्र चोपडा, अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक मनोज कोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, अजय चितळे, तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.