माधव भांडारी
माधव भांडारी सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

माधव भांडारी म्हणाले, कार्यकर्त्यांना सूडबुद्धीने वागवू नका...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड व मालेगाव येथे धार्मिक कारणाने दंगली भडकल्या. यावरून राज्यात महाविकास आघाडी व भाजप नेत्यांत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू झाले आहे. यात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर टीका केली. Madhav Bhandari said, do not treat the workers with revenge ...

माधव भांडारी म्हणाले, अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीर्वादाने झाल्या आहेत. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी भाजप तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने खटले दाखल केले जात आहेत. प्रशासनाने भाजप कार्यकर्त्याना खोट्या गुन्ह्याखाली अडकवणे थांबवावे.

भांडारी पुढे म्हणाले, की बारा नोव्हेंबर रोजी अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोर्चे काढण्यासाठी कोणत्या संघटनांनी स्थानिक प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागितली, त्याची कागदपत्रे सरकारने जनतेपुढे ठेवावीत, या मोर्चांमध्ये किती संख्येने लोक सहभागी होतील, याची माहिती प्रशासनाकडे आली असेल तर तीही प्रसिद्ध करावी तसेच अमरावतीत अटक केलेल्या सर्वांची नावे आणि त्यांचे राष्ट्रीयत्व जाहीर करा, अशा मागण्याही भांडारी यांनी यावेळी केल्या.

मालेगाव येथे दंगल प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक झाली का याची माहितीही सरकारने जाहीर करावी, असेही भांडारी यांनी सांगितले. नांदेड येथे अटक केलेला एक दंगलखोर पोलिसांच्या तावडीतून पळाला आहे. अजूनही पोलिस त्याला पकडू शकले नाहीत, अशी माहितीही त्यांनी दिली.

राज्य सरकारने भरपाई द्यावी!

राज्यात अमरावती, नांदेड व मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगलीत समाजकंटकांकडून अनेक दुकानांची लुटालूट करण्यात आली. दंगलखोरांना रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याने या नुकसानीची भरपाई राज्य सरकारने त्वरीत द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश व्यापारी आघाडीतर्फे बुधवारी करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT