<div class="paragraphs"><p>Madhukar Nawale, Akole</p></div>

Madhukar Nawale, Akole

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

मधुकर नवले म्हणाले, अकोलेचे बिहार झाले आहे...

शांताराम काळे

अकोले ( अहमदनगर ) : अकोले ( Akole ) नगरपंचायतची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही निवडणूक काँग्रेस ( Congress ) स्वबळावर लढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi ) बिघाडी निर्माण झाली आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर नवले यांनी मोठा आरोप केला आहे. Madhukar Navale said, Akole has become Bihar ...

अकोले नगरपंचायत निवडणूक 2021 ही रंगतदार स्थितीत आली असून शेवटचे 3 दिवस प्रचाराला राहिलेले आहे भाजपने प्रत्येक प्रभागात सभा, गाठी भेटी वाढविल्या आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेस ही प्रभागात प्रचार करताना दिसत आहे. काँग्रेस पक्षाने प्रत्येक प्रभागात प्रचाराचा प्रारंभ केला असून काँग्रेस पक्ष एकूण 7 जागा लढवीत आहे. विशेष म्हणजे या कमी असलेल्या 7 जागांवर 2 मूळ इतर मागसवर्गीय, 1 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती व 3 जागा सर्वसाधारण उमेदवार देऊन सामाजिक समतोल साधित न्याय दिला असल्याचे दिसते.

काँग्रेसच्या प्रचाराच्या प्रारंभ प्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर नवले म्हणाले, उमेदवार पळवापळावीमुळे अकोल्यात निवडणुकीला बिहार, उत्तरप्रदेशचे स्वरूप आले आहे. प्रत्येक प्रभाग हा आपलाच प्रभाग आहे. या भावनेतून काँग्रेस जागा लढवीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, प्रभाग 1 मधील भाजप अधिकृत उमेदवार व प्रभाग7 मधील काँग्रेस पक्षाचा उमेदवार दमदाटी करून पळवून नेणे ही बाब बिहार व उत्तरप्रदेश प्रमाणे अकोल्यात होत आहे. महाविकास आघाडी व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊनही काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवुन राष्ट्रवादीला 13 पैकी 10 जागा व शिवसेनेला 3 जागाचे वाटप करून आघाडीत बिघाडी केली. हे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे अपयश आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला 13 जागा वर उमेदवार देता आले नाही. आम्ही या सर्व जागा स्वबळावर लढत आहोत. प्रभाग 7 मध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला एबी फॉर्म देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने मुद्दामहून आपला एबी फॉर्म देऊन काँग्रेसचा उमेदवार नेल्यामुळे तेथे काँग्रेस पक्ष नाराज असल्याची भावना मधुकर नवले यांनी व्यक्त केली.

भाजप बरोबरच काँग्रेस पक्षाने प्रसारात आघाडी घेतल्याचे दिसते. आज (गुरुवार) पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांची प्रभाग 12 व 16 मध्ये संयुक्त सभा व प्रभाग 10 मध्ये भेट असा दौरा आयोजित केला होता. उद्या (शुक्रवारी) सायंकाळी 5 वाजता राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी अकोले बस स्थानकशेजारी असलेल्या मातोश्री मेडिकलच्या जवळच्या मोकळ्या प्रांगणात जाहीर सभा आयोजित केली आहे. शनिवारी ( ता. 18 ) श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे व रिपाई गवई गटाचे सुधाकर रोहम यांची प्रभाग 6 व 12 साठी सभा आयोजित केली असल्याची माहिती मधूकर नवले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT