Madhukar Pichad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मधुकरराव पिचडांनी केली शरद पवारांसाठी प्रार्थना

भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी शरद पवार यांना बरे लागावे यासाठी परमेश्वराची प्रार्थना केली.

Amit Awari

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे एककाळ त्यांचे सहकारी राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांनी शरद पवार यांना बरे लागावे यासाठी परमेश्वराची प्रार्थना केली तसेच सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. Madhukarrao Pichad prayed for Sharad Pawar

ज्येष्ठ नेते शरद पवार ही नुकतेच कोरोना बाधित आढळून आले आहेत. ते कोरोनातून लवकर बरे व्हावेत अशा पोस्ट सोशल मीडियावर पडत आहेत. यात मधुकरराव पिचड यांच्याही ट्विटची भर पडली आहे. मधुकरराव पिचड हे शरद पवार यांचे जुने सहकारी होते. 14 वर्षे त्यांनी मंत्रीपद भुषविले. शरद पवार मुख्यमंत्री असतानाच राज्यात आदिवासी मंत्रालयाची स्थापना झाली. याच काळात पिचडांनी देशातील पहिला आदिवासींसाठीचा अर्थसंकल्प मांडला होता.

2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा पासून पिचड व पवार यांच्यातील दरी वाढत गेली. त्यामुळे शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांच्या विरोधात पक्षाचे तिकीट दिले. ही निवडणूक शरद पवार व अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत डॉ. किरण लहामटे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या आदिवासी समाजाच्या संमेलनात शरद पवार प्रमुख पाहुणे होते. तेथे शरद पवार यांनी भाषणातून पिचड यांचा नामोल्लेख टाळला होता.

मधुकरराव पिचड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे कोरोना आजाराने आजारी पडले आहे. ते या आजारातून लवकर बरे व्हावेत अशी मी परमेश्वरचर्णी प्रार्थना करतो आणि देशाच्या आदीवासी जनतेला नम्र विनंती करतो की त्यानी परमेश्वराचर्णी प्रार्थना करावी, असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT