Madhuri elephant, beloved by Kolhapur residents, is set to return to Nandani Math after approvals for a Vantara conservation and rehabilitation center. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madhuri elephant : लढले, भिडले, नडले पण कोल्हापूरकरांनी करून दाखवलं! माधुरी हत्तीण नांदणी मठात परतण्याचा मार्ग मोकळा

Madhuri elephant’s return to Nandani Math : 'उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरी हत्तीणीच्या एकूण आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. शिवाय नांदणी मठाचे माहूत आणि माधुरी हत्तीण यांच्यातील विशेष नातेसंबंधही अहवालात नमूद करण्यात आलेत.'

Jagdish Patil

Kolhapur News, 16 Dec : कोल्हापूरकरांसाठी एक आंनदाची बातमी आहे. ती म्हणजे कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी हत्तीण गुजरातमधील वनतारा प्रकल्पामधून पुन्हा नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरकरांच्या लढ्याला यश आल्याचं पाहायला मिळत आहे. सुप्रीम कोर्टाच्या उच्चाधिकार समितीसमोर सुरू असलेल्या सुनावणीत नांदणी मठाच्या जागेत वनताराचे संवर्धन केंद्र उभारण्यास पूर्वपरवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुढील काही महिन्यांतच माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात येऊ शकते.

मुंबईत झालेल्या सुनावणीत नांदणी मठाच्या अखत्यारित असलेल्या जागेत वनताराचे संवर्धन (पुनर्वसन) केंद्र उभारण्यास उच्चाधिकार समितीने बांधकामपूर्व परवानगी दिली आहे. यामुळे माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात वास्तव्यास येण्याबाबत सकारात्मकता निर्माण झाली असल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली आहे.

वकिलांनी सांगितलं की, उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. मनोहरन यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरी हत्तीणीच्या एकूण आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. शिवाय नांदणी मठाचे माहूत आणि माधुरी हत्तीण यांच्यातील विशेष नातेसंबंधही अहवालात नमूद करण्यात आलेत.

या अहवालाच्या आधारे पुढील पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. तर उच्चाधिकार समितीचे प्रमुख वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नांदणी मठ संस्थान, वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांचा संयुक्त प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीनंतर माधुरी हत्तीणीच्या पुनर्वसनाबाबत जागेवरील काम सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया समितीकडून पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे अखेर माधुरीला नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता कोल्हापुरकरांना मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT