<div class="paragraphs"><p>Shivraj Singh Chouhan</p></div>

Shivraj Singh Chouhan

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चौहान शनिदेव आणि साईबाबांपुढे नतमस्तक...

विनायक दरंदले

सोनई ( जि. अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर व शिर्डी ही दोन देवस्थाने जगभरात प्रसिद्ध आहेत. राजकीय संकट दूर करण्याची आशा मनात घेऊन केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील राजकीय पुढारी शनिदेव व साईबाबांच्या चरणी नतमस्त होतात. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह याच्या प्रमाणेच आता मध्यप्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानही ( Shivraj Singh Chouhan ) शनिशिंगणापूर व शिर्डीला येऊ लागले आहेत. Madhya Pradesh Chief Minister Chouhan Shanideva and Sai Baba bow down

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल ( शनिवारी ) सायंकाळी आपल्या परिवारासह शनिशिंगणापूरला भेट देवून स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन घेतले. या भेटीच्या दरम्यान पोलिसांनी वीस मिनिटे दर्शन व्यवस्था बंद केल्याने भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या शिवाय त्यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

चौहान यांनी आपल्या परिवारासह उदासी महाराज मठात विधिवत अभिषेक करुन शनिदेवापुढे नतमस्तक झाले. जनसंपर्क कार्यालयातील शनिप्रतिमाचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी उपाध्यक्ष विकास बानकर, कोषाध्यक्ष दीपक दरंदले, बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते.वर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबा व शनिदेवाचे दर्शन घेतल्याने ही उर्जा वर्षभर राहते. कोरोनाचे संकट हटू दे अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

वडापाव व उसाचा रस...

मुख्यमंत्री चौहान अनेक वर्षापासून एक जानेवारीला दर्शनासाठी येतात. दरवर्षी प्रमाणे त्यांनी आज सोनईतील आशोका वडापावच्या हातगाडीवर थांबून पार्सल घेतलीतर वंजारवाडी येथील मामा रसवंती गृह येथे उसाच्या रसाचा अस्वाद घेतला. येथील गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT