Mahabaleshwar Palika
Mahabaleshwar Palika sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाबळेश्वर नगराध्यक्षा चौकशी; अहवाल देण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून दिरंगाई

अभिजित खुरासणे

महाबळेश्वर ः महाबळेश्वरच्या तत्कालिन नगराध्यक्षांनी केलेला भ्रष्टाचार व अनियमितता याबाबत युवा सेनेचे उपाध्यक्ष सचिन वागदरे यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांनी अहवाल सादर केला होता. याबाबत नगरविकास खात्याच्या अतिरिक्त सचिव प्रतिभा पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना चौकशी करून पुरावे सादर करण्याची सूचना केली होती. मात्र, दिर्घकाळ लोटुनही अहवाल न आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १५ दिवसांत लेखी अहवाल देण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

महाबळेश्वर नगरपालिकेतील भ्रष्ट्राचाराबाबत सातारा जिल्हा युवासेना उपाध्यक्ष सचिन वागदरे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये तत्कालिन नगराध्यक्षा, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी स्वच्छता अभियानामधील करोडो रुपयांच्या टेंडरमध्ये कोणतीही कायदेशीर पद्धतीचा अवलंब न करता, तांत्रिक मंजुरी न घेता आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना टेंडर दिली असल्याचा आरोप केला होता.

स्वच्छता अभियानात नियमबाह्य कामे करुन मनमानी अवास्तव रकमा लावुन टेडर काढतां कचरा डेपो, रंगरंगोटी घंटागाडी खरेदी, डस्टबीन खरेदी, बाजार मुल्यापेक्षा, लेन्स कॅमेरा खरेदी, स्वच्छता अभियानात जाहिरातीं करीता दिलेले टेंडर घोटाळा, यतिराज बांधकाम कंपनीच्या बांधकाम ठेक्यांबाबत. स्वच्छता जनजागृती करीता वापरलेल्या सामग्रीमध्ये नियमबाह्यता, सोशल मिडीया जनजागृतीमध्ये बोगस कर्मचारी दाखवुन बिले काढुन कोटी रुपयांचा चुना नगरपालिकेला लावल्याची तक्रार श्री. वागदरे यांनी केली होती.

दरम्यान २०२१ पासुन या भ्रष्ट्राचाराची चौकशी सुरु असुन नगरपालिकेचा कार्यकाल संपुन देखील प्रशासनाकडून चैाकशी अहवाल शासनाला सादर करण्यात विलंब का झाला हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, या विलंबाची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याच्या नगरविकास विभागाच्या उप सचिव स.ज.मोघे महाराष्ट्र शासन यांनी घेवुन १५ दिवसांत कोणत्याही परीस्थितीत अहवाल सादर करण्याचा आदेश सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT