सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) हे आपल्या हटके अंदाजासाठी ओळखले जातात. ते कायम चर्चेत असतात. जानकर हे सदस्य असलेले पंचायत राज्य समिती सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात होती. त्यावेळी एका गावात जानकर यांनी चक्क बटाटे वडे तळले. त्याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Mahadev Jankar fried 'Batate Vade' in Akkalkot)
पंचायत राज समिती गुरुवारी (ता. १६) अक्कलकोटच्या दौऱ्यावर होती. त्या समितीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचाही समावेश होता. अक्कलकोट तालुक्यातील चपळगावमध्ये बचत गटाच्या महिलांकडून हॉटेल चालवले जाते. त्यावेळी तिथे एक आजी बटाटे वडे तळत होती. ते पाहून महादेव जानकर यांनी त्यांच्या हातातील झारी घेऊन बटाटे वडे तळण्याचा प्रयत्न केला. या वेळी या समितीचे सदस्य असलेले आमदार विक्रम काळे, अंबादास दानवे, मेघना साकोरे-बोर्डीकर हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महादेव जानकर हे वडे तळत असताना, ‘महादेव जानकर यांच्या वडे तळण्याची वेळ,’ अशी हेडलाईन होईल असा चिमटा काढला. त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला.
सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पंचायत राज समितीच्या दौऱ्यात अनेक मजेदार किस्से पाहायला मिळत आहेत. एकीकडे सांगोल्यात माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अडवून पैसे मागणाऱ्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असताना दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांचा हा वडे तळतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे. तसेच, राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे करमाळ्यात सत्कार सर्वांत शेवटी केल्याने संतापले हेाते. त्यांनी तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का, असा प्रश्न सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना विचारला होता. त्यामुळे पंचायत राज समितीच्या सदस्यांचा सोलापूर दौरा हा नानाविध कारणांनी गाजत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.