Mahadev Jankar, Vijaysingh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politics : माढ्याचं मैदान मारण्यासाठी जानकरांना मिळणार का विजयसिंह मोहिते-पाटलांची साथ ?

Mahadev Jankar Meet Vijaysingh Mohite Patil : माढा लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयसिंह मोहिते पाटील यांच्या गटाची साथ मिळाली होती.

Umesh Bambare-Patil

Madha Lok Sabha Political News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी संपर्क मोहीम सुरू केलेली आहे. त्यातूनच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता मैदान मारण्यासाठी मोहिते-पाटलांची साथ जानकरांना (Mahadev Jankar) मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता आता कधीही लागू शकते. त्यामुळे माढा मतदारसंघात हालचालींना वेग आला आहे. महायुतीकडून अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) हे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. तसेच विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धवलसिंह मोहिते- पाटील यांनीही उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केलेले आहे. दरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. परिणामी महायुतीत माढ्यावरून वाद रंगला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना विजयसिंह मोहिते- पाटील (Vijaysinh Mohite–Patil) यांच्या गटाची साथ मिळाली होती. माळशिरस तालुक्यातून निंबाळकरांना एक लाखाचे मताधिक्य मिळाले होते. पण, त्यानंतर मागील पाच वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत मोहिते-पाटलांची खासदार निंबाळकरांना साथ मिळणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

हा मतदारसंघ यावेळेसही भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) हे आग्रही भूमिका घेऊन आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना साथ मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी संपर्क मोहीम सुरू केली आहे. नुकतीच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते -पाटील यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांत विविध विषयांवर चर्चादेखील झाली. आता या वेळेस जानकरांना मोहिते-पाटलांची साथ व आशीर्वाद मिळतील का, हा प्रश्न अद्यापतरी गुलदस्तात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT