Mahadev Jankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : बारामतीनंतर महादेव जानकर घालणार सातारा जिल्ह्यात लक्ष...

जिल्हा परिषद शाळेतील Zilla Parishad Schools विद्यार्थ्यांना ही चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण पद्धतीत education system बदल व्हावा. तसेच लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा Free medical facilities मिळाव्यात ही आमची भूमिका असणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

वाठार स्टेशन : सातारा जिल्ह्यातील विकास कामाकरता आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र येतो आणि विकास कामे मंजूर करून घेतो हा इतिहास आहे. भविष्यात सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्ष मजबूत करण्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी संघटन कायम ठेवा, असे आवाहन माजी दुग्धविकास मंत्री, आमदार महादेव जानकर यांनी केले आहे.

जाधववाडी (ता. कोरेगाव) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते झाला. यावेळी रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, रासप महाराष्ट्र राज्य मुख्य सचिव ज्ञानेश्वर सलगर, बबन विरकर, भाऊसाहेब वाघ उपस्थित होते.

आमदार जानकर म्हणाले, खेडेगावांची प्रगती झाली पाहिजे. यासाठी लोकांनी संघटीत होणे गरजेचे असून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ही चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण पद्धतीत बदल व्हावा. तसेच लोकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात ही आमची भूमिका असणार आहे.

जाधववाडी सारख्या खेडेगावात कोणत्याही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष येणार नाही. पण, महादेव जानकर येणार कारण या गावच्या भाऊसाहेब वाघ या नेत्त्त्वाने जिल्ह्यात रासप पक्ष जिवंत ठेवला. आजही ही निष्ठा असल्याने या गावात ५४ लाखांची विकास कामे करणे शक्य झाले. भविष्यात सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्ष मजबूत करण्याचे काम करावे लागणार आहे. त्यासाठी संघटन राहु द्यात, असे आवाहन आमदार जानकर यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT