सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्ष (RSP) हा माझा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) आहेत. ते आम्हाला जसं सांगतील त्या पद्धतीने आम्ही विधान परिषदेच्या निवडणुकीत करू, असे राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी स्पष्ट केले. (Mahadev Jankar will tell you to vote for him: Ratnakar Gutte)
पंचायत राज समिती करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विधान परिषद निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आहे. आमच्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर आहेत. ते आम्हाला जसं सजेस्ट करतील, जसं बोलतील, काय करायचं ते चर्चेनंतर ठरविण्यात येईल आणि आमचे नेते जानकर जसं सांगतील ते करण्यात येईल, असेही आमदार गुट्टे यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीबाबत अनेकांनी माझ्याशी संपर्क साधला आहे. मात्र, आमचे नेते महादेव जानकर ज्या प्रमाणे सांगतील, त्या पद्धतीने मतदान करण्यात येईल. माझी आणि नेत्यांची उद्या भेट होईल. त्यानंतर आम्ही या विषयावर चर्चा करणार आहोत. मुंबईला जाऊन चर्चा करू आणि चर्चेअंती जो फैसला होईल, त्याप्रमाणे मतदान करण्यात येईल, असेही रत्नाकर गुट्टे यांनी स्पष्ट केले.
करमाळ्यात सत्कार समारंभावेळी प्रोटोकॉल चुकल्याने आमदार गुट्टे संतापले होते. त्यावर बोलताना आमदार म्हणाले की, प्रोटोकॉल चुकला होता; म्हणून बोललो. त्यांच्याकडून अशी चूक पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांच्या लक्षात आणून दिले आहे. त्यात रागवण्याचा हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काय घडलं होतं करमाळ्यात?
पंचायत राज समितीचे पथक करमाळ्याच्या दौऱ्यावर होते. करमाळ्यात आल्यानंतर समितीचे सदस्य आमदार कृष्णा गजबे, आमदार शेखर निकम, त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व इतर चार अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. सर्वात शेवटी आमदार रत्नाकर गुट्टे यांचे नाव सत्कारासाठी पुकारले गेले. तेव्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे गुट्टे यांचा सत्कार करण्यासाठी पुढे आले, तेव्हा गुट्टे चांगलेच संतापले. ‘तुम्हाला प्रोटोकॉल समजत नाही का?’ असा प्रश्न त्यांनी स्वामींना केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.