Satej Patil, Mahadevarao Mahadik
Satej Patil, Mahadevarao Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

kolhapur News : विजयाचा गुलाल उधळताच महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना इशारा; राजकारणाला वेगळी दिशा मिळणार...

सरकारनामा ब्यूरो

Rajaram Cooperative Sugar Factory Election : कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांनी दणदणीत विजय मिळवाल. विजय मिळाल्यानंतर त्यांनी विरोधी गटाचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांना इशारा दिला.

महादेवराव महाडिक यांनी विजयाचे श्रेय सभासदांबरोबरच माजी आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना दिले आहे. या विजयामुळे कोल्हापूरच्या (kolhapur) राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याचे महाडिक यांनी सांगितले.

राजाराम साखर कारखाना निवडणुकीत महादेवराव महाडिक यांचा 39 मतांनी विजय झाला आहे. त्यांच्या गटातील उमेदवारांनी विजयाकडे घोडदोड सुरु केली आहे. माध्यमांशी बोलताना महादेवराव महाडिक म्हणाले, आजचा विजय हा आवाडे सावकार, विनय कोरे यांच्यासह सर्व महाडिक गटाचा असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

महाडिक म्हणाले, महाडिकांकडे असलेली ताकद ही गोरगरीब जनतेची आहे. धनंजय महाडिक, अमल महाडिक यांना पहिले सलामी द्या, मग बाकीचे पुढे पुढे पाहू. ज्याला शड्डू मारायला येत नाही, त्याला शड्डू मारायला शिकवत आहे. मी शेलार मामा आहे, मी फूकून उडवून टाकेन, असा थेट इशारा त्यांनी सतेज पाटील गटाला दिला.

महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली आहेत. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मते मिळाली आहेत. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण केले होते. कारखानाच्या नऊपैकी सहा गटातून महाडिक गटाने बाजी मारली आहे. सरासरी अडीच हजार मतांनी उमेदवार आघाडीवर आहे.

पहिल्या फेरीत १ ते २९ मतदान केंद्र व दुसऱ्या फेरीत ३० ते ५८ केंद्रांवरील मतमोजणी होणार आहे. एकूण २९ टेबलांवर ही मतमोजणी होत आहे. प्रत्येक टेबलावर ४ अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण १५० कर्मचारी मतमोजणीसाठी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT